बकऱ्यांना चारता चारता खोदले १४ तलाव, ४० वर्षांपूर्वी सुरूवात
८२ वर्षांच्या केरे कामेगौडा यांनी पहाड तोडला नाही तर तलावचं खोदलायं.
नवी दिल्ली : तुम्ही बिहारच्या दशरथ माझींबद्दल ऐकलं असेल ज्याने डोंगर फोडुन रस्ता बनवला. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातही एक इसमाने असाच कारनामा केलायं. ८२ वर्षांच्या केरे कामेगौडा यांनी पहाड तोडला नाही तर तलावचं खोदलायं. एक-दोन नाही तर तब्बल १४ तलाव खोदले आहेत. त्यांच घर डासनाडोड्डीमध्ये असून आजही त्यांचा परिवार झोपडीतच राहतो. कामेगौडा हे आपल्या घराऐवजी कुंदिनीबेट्टा गावाजवळ मेंढी चरवतात.
कामेगौडा म्हणतात...
'सुरूवातीला मी लाकडाने खड्डे खोदत असे जे खूप कठीण काम होतं. मी काही अवजार खरेदी करण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी मला काही मेंढ्या विकाव्या लागल्या. खड्ड्यांचं रुपांतर तलावात झाल्यानंतर जनावरांना पाणी मिळतयं हे मला जाणवलं. हे पाहून मी माझ काम सुरू ठेवलं.
'कोणतही शिक्षण न झालेल्या कामेगौडा यांनी पाण्याचा प्रवाह आणि इतर टेक्निक विकसित करून घेतल्या. माझे वडिल फक्त रात्री घरी येतात, दिवसभर ते डोंगरावरील आपली झाडे आणि तलावाची काळजी घेत असतात', असे त्यांचा मुलगा कृष्णात सांगतो.
२०१७ पर्यंत कामेगौडा यांचे सहा तलाव खोदून झाले होते पण एका वर्षात कामात वृद्धी झाली आणि हा आकडा डबल झाल्याचे स्थानिक सांगतात. कामेगौडा यांना त्यांच्या कामासाठी कित्येक पारितोषिक आणि पैसे मिळाले पण या पैशांचा उपयोग ते स्वत: साठी न करा तलाव बनविण्यासाठी करतात. त्यांनी या पैशांतून हत्यार खरेदी केले आणि मजदूरांकडुन तलाव बनवून घेतले.