मंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते एसएम कृष्णा यांचे जावई तसंच कॅफे कॉफी डे चे मालक आणि संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता आहे. कर्नाटकच्या मंगळुरूमधून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. नेत्रावती नदीजवळ ते उतरले आणि अचानक बेपत्ता झाले. त्यांनी नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होतो आहे. सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही स्विच ऑफ आहे. त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरु केलीय. सिद्धार्थ यांच्या बेपत्ता होण्याची बातमी समजताच एसएम कृष्णा यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी होऊ लागलीय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे मालक असून देशातील कॉफीच्या बियाणांचे सर्वात मोठे निर्यातदारही आहेत. काही आयटी कंपनीतही त्यांची भागीदारी आहे.



जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा एस.एम कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहोचले. 




सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण, अद्यापही त्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सध्याच्या घडीला सिद्धार्थ यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या एका पत्राने सर्वांनाच धक्का दिला आहे. झी बिझनेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार घरातून निघण्यापूर्वी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये आपण, गेल्या बऱ्याच काळापासून परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न केला. पण, याहून जास्त तणाव आपण झेलू शकत नसल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं.