बंगळुरु : कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ अपात्र आमदारांना आता भाजप पक्षात घेणार आहे. तशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी दिली. उद्या सर्व बंडखोर आमदार अर्थात अपात्र ठरलेले १७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे आमदार अपात्र ठरल्याने कर्नाटकात आता पोटनिवडणूक अटळ आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली तर त्यांना निवडणून आणणे भाजपसाठी मोठे आव्हाण असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ अपात्र आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी निर्णय दिला. त्यांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे  भाजपपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, तसेच सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, हे १७ अपात्र आमदार निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे भाजपकडून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. हे १७ बंडखोर आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.



कर्नाटक आमदारांना अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते, याचा आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने २५ ऑक्टोबरला सगळ्या पक्ष्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर हा निर्णय घेतला होता. कर्नाटकच्या १७ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्यात आला. आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. मात्र, त्या १७ आमदारांना निवडणूक लढता येणार आहे. कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी या १७ आमदारांना अपात्र ठरवले होते.