Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेस (Congress) ने जोरदार मुसंडी मारली आहे.  सुरुवातीच्या निकालानुसार कर्नाटकात 224 जागांपैकी काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजपाचे (BJP) पिछेहाट झाली असून त्यांना 100 च्या आत थांबावं लागलं आहे. दुसरीकडे जेडीएसने 24 जागांवर झेप घेतली आहे. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सोबत त्यांनी एक कॅप्शनही लिहिला आहे. मी अजेय आहे, मला खूप भरवसा आहे, मी आज अजेय आहे, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर काँग्रेस पक्षानेही एक व्हिडिओ शेअर केला असून भारत जोडो यात्रेचा हा व्हिडिओ आहे. 50 सेकंदाच्या या व्हिडिओत मागे एक म्यूझीक असून मै आज अयेज हू (I'm unstoppable today), असं वाक्य त्यावर टाकण्यात आलं आहे. 



कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी म्हणजे 10 मेला मतदान पार पडलं. यानंतर झालेल्य एक्झिट पोलमध्येही कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं होतं. 



काँग्रेसने काय दिलं होतं आश्वासन?
काँग्रेसने प्रचारात बोम्मई सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. बोम्मई सरकारवर 40 कमिशनखोरीचा आरोप,  महागाई आणि बेरोजगारीवरून भाजपवर निशाणा, बजरंग दल आणि PFI वर बंदी घालण्याचे आश्वासन , सत्तेत आल्यास मुस्लिमांना पुन्हा 4 % आरक्षण लागू, महिलांना 2 हजार रुपये मासिक वेतन, बसमधून महिलांना मोफत प्रवास, पदवीधारकांना 3 हजार रुपये बेरोजगार भत्ता, डिप्लोमाधारकांना 1500 रूपये बेरोजगार भत्ता, प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ मोफत आणि सामान्यांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज ही आश्वासनं दिली आहेत.