मुंबई : कर्नाटकमध्ये 224 जागांवर 12 मेला निवडणूका होणार आहेत. याकरिता भाजप  सरकारने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 72 जणांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. 


येडियुरप्पांना तिकिट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये बी एस येडियुरप्पा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. शिकारीपुरा भागातून त्यांना तिकिट देण्यात आलेले आहे. 


इतर कोणाला मिळालं तिकिट ? 


निप्पनीमधून शशिकला, अथानीमधून लक्ष्मण सावदी, बेळगाव ग्रामीण मधून संजय पाटील, बीजापूर सिटीतून  बसवानगौडा पाटील, शिमोगातून केएस ईश्वरप्पा यांना तिकिट देण्यात आलेले आहे.  


 



 


बीएस येडियुरप्पा 


कर्नाटकमध्ये बी एस येडीयुरप्पा यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून आहे. शिमोग येथील लोकसभेच्या मतदार संघाचे ते खासदार आहेत सोबतच ते कर्नाटक भाजपा अध्यक्ष आहेत.
2008 विधानसभेत ते राज्याचे 19 वे मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा हे भाजपाचे दक्षिण भारतातील पहिले मुख्यमंत्री आहेत. यंदा त्यांना शिकारीपुरा विभागातून तिकिट देण्यात आले आहे.