नवी दिल्ली : कर्नाटकच्या दावनगेरे जिल्ह्यातील एका बँक मॅनेजरनं कर्ज मंजूर करून देण्यासाठी एका महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली... त्यानंतरचं दृश्यं आता सोशल मीडियातून सार्वजनिक झालंय... महिलेकडून मॅनेजरची होणारी यथेच्छ धुलाई सोशल मीडियावर व्हायरल झालीय. महिला अगोदर काठीनं आणि नंतर चप्पलनं धुलाई करताना या व्हिडिओत दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेनं केलेल्या आरोपानुसार, बँकेत दोन लाखांचं कर्ज घेण्यासाठी तिनं अर्ज केला होता. परंतु, बँक मॅनेजरनं हे कर्ज मंजूर करण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. इतकंच नाही तर मॅनेजरनं चुकीच्या उद्देशानं आपल्याला स्पर्श केल्याचंही महिलेनं म्हटलंय. 


हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मॅनेजरला अटक केलीय. देवाईया नावाचा हा आरोपी डीएचएफएल लोन एजन्सीमध्ये काम करतो. 


ही घटना सोमवारची असल्याचं समजतंय. व्हिडिओच्या शेवटी एक व्यक्ती या मॅनेजरला वाचवण्यासाठी  पुढे आलेला दिसतो... त्यामुळे तो महिलेच्या तावडीतून सुटला. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.