बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची प्रकृती ठीक असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सध्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे देखील सांगितले आहे.


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर माहिती दिली की, 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. मी विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करावी आणि स्वत:ला सेल्फ क्वारंटाईन ठेवावे.'