...आणि ११० वर्षांच्या आजीनेही अशी केलीय कोरोनावर मात
११० वर्षीय महिलेने कोरोनावर आश्चर्यकारकरित्या मात केलीयं
चित्रदुर्ग : देशात आतापर्यंत ११ लाख ४५ हजार ६२९ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातचं कर्नाटकमधील चित्रदुर्गमधून एक दिलासादायक बातमी समोर येतेय. इथल्या ११० वर्षीय महिलेने कोरोनावर आश्चर्यकारकरित्या मात केली आहे. पूर्ण बरी झाल्यानंतर आजीबाईंना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अजीबाईंचं नाव सिद्धम्मा असे असून त्या पोलीस क्वार्टर्समध्ये राहतात. सिद्धम्मा यांना ५ मुले, १७ नातवंड आणि २२ पणतू आहेत. सिद्धम्मा यांना त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना २७ जुलैला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं.
त्या सर्वांना चित्रदुर्ग येथील कोविड-१९ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सिद्धम्मा आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६५.४४ टक्के इतकं झालं आहे. देशातील रिकव्हरी आणि डेथ रेशियो ९६.८४ टक्के : ३.१६ टक्के इतका झाला आहे.
राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात आहे. पुण्यात सध्या करोनाचे ४४ हजार २०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ६२.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
आकडेवारी
महाराष्ट्रात दिवसभरात ९ हजार ५०९ कोरोना रुग्ण आढळल्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. महाराष्ट्रात आता कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली आहे. तर २६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५ हजार ५७६ रुग्णांना कोरोना मुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण कोरोनाच्य विळख्यातून बाहेर पडले आहेत.