बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सिद्धारमैया यांनी म्हटलं की, दलित उमेदवार असेल तर त्याच्यासाठी मी मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडायला देखील तयार आहे. सिद्धारमैया यांनी म्हटलं की, 'जर कोणत्याही दलित व्यक्तीला मुख्यमंत्रीपद देण्य़ाची वेळ आली तर मी यापासून स्वत:ला वेगळं करुन घेईल. कोणत्या दलित व्यक्तीसाठी मला मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं तर मी मागे नाही हटणार'.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी सीएम सिद्धारमैयांनी एक्झिट पोलमध्ये भाजपला मिळत असलेल्या यशाला नकार दिला होता. त्यांनी म्हटलं की, काँग्रेस पूर्ण बहुमतासह पुन्हा सत्तेत येईल. एक्झिट पोलमध्ये त्रिशंकु विधानसभा होणार असल्याच्या शक्यतेला ट्विट करत ही मनोरंजक माहिती असल्याचं म्हटलं आहे.



सिद्धारमैया यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, 'एक्झिट पोल पुढच्या 2 दिवसासाठी मनोरंजनाचं साधन आहे. एक्झिट पोल त्या व्यक्ती सारखं आहे ज्याला पोहता नाही येत. पण त्याला माहित आहे की तो यात बुडणार नाही. कारण त्याला नदीची खोली फक्त 4 फूट असल्याचं सांगितलं जातं. पण हे देखील नाही विसरलं पाहिजे की, 6+4+2 ची सरासरी देखील 4 होते. पण फूट खोलीत तुम्ही बुडून जाणार.' पुढे त्यांनी म्हटलं की, 'सर्व कार्यकर्ते, समर्थक आणि शुभचिंतक, एक्झिट पोलबाबत चिंता करु नका. सुट्टीच्या दिवशी आराम करा. आपण पुन्हा येतोय.'