कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा याच्यानंतर त्यांचे ६ कर्मचारीही कोविड -१९ पॉझिटिव्ह
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा (Yediyurappa आणि त्यांची मुलगी हे कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमित झाले होते. आता कर्नाटकमधील त्यांचे सहा कर्मचारी कोविड -१९ (Covid-19) पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा (Yediyurappa आणि त्यांची मुलगी हे कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमित झाले होते. आता कर्नाटकमधील त्यांचे सहा कर्मचारी कोविड -१९ (Covid-19) पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. रविवारी सीएम येरियुरप्पा यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वतःला दिली होती. यानंतर त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचार्यांचा नमुनाही घेण्यात आला. त्यांच्या सहा कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे चाचण्यांमध्ये आढळले आहे.
सोमवारी मुख्यमंत्री कार्यालयातील अन्य सहा कर्मचार्यांनाही संसर्ग झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये एक सुरक्षा रक्षक, चालक आणि घरातील नोकर यांचा समावेश आहे. येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलीने उपचार सुरु केले असताना त्यांच्या मुलाचा अहवाल नकारात्मक झाल्यावर त्यांना घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
३१ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेले राज्याचे राज्यपाल वजुभाई वाला आणि गृहमंत्री बसवराज बोम्मई यांचा कोरोना चाचणी अहवालही निगेटिव्ह आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घर निर्जंतुकीकरण झाल्यानंतर तेथे जाण्यास बंदी आहे. मणिपाल रुग्णालयात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, लोकांच्या प्रकृतीबद्दल चिंता करु नका, मी लवकर बरा होईन. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची स्थिती स्थिर आहे. घाबरण्याचे कारण नाही.
विशेष म्हणजे येरियुरप्पा हे कोविड -१९ संक्रमित झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. सध्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही कोरोना लागण झाल्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल केले आहे.