कॉंग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे (mallikarjun kharge) यांनी पक्षासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. हिमाचल प्रदेश (himachal pradesh) आणि गुजरात (gujarat) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीत काँग्रेसही (Congress) कर्नाटककडे (karnataka) लक्ष्य घालण्यास सुरुवात केली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत मात्र कॉंग्रेस पक्ष आतापासून तयारीला लागल्याचे दिसत आहे. सध्या काँग्रेसकडून निवडणुकीच्या तिकिटांच्या माध्यमातून उमेदवारांच्या मदतीने निधी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge) यांनीही राज्य युनिटला उमेदवारांच्या नावांची यादी तयार करण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. (karnataka congress Orders to party worker want ticket for election deposit a DD of two lakhs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) चे अध्यक्ष डीके शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी बुधवारी सांगितले की त्यांना आणि इतर इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी अर्ज करताना 2 लाख रुपयांचा डीडी (DD) जमा करावा लागेल.  5 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान हे अर्ज भरायचे आहेत. याशिवाय अर्जाची किंमत 5000 रुपये असेल.  तसेच, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी 50 टक्के सूट असेल म्हणजेच त्यांना 1 लाख रुपये जमा करावे लागतील, असेही डीके शिवकुमार म्हणाले.


यातून जमा होणारा पैसा पक्षाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी वापरला जाणार असल्याची माहिती आहे. यासोबतच ही रक्कम विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारासाठीही वापरली जाणार आहे. "विद्यमान आमदारांनाही तिकिटासाठी अर्ज करावा लागणार आहे. मलाही अर्ज करावा लागेल. कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे," असे शिवकुमार म्हणाले.


निधी का उभारला जात आहे?


हा पैसा पक्षाची नवीन इमारत बांधणे, पक्षनिधी, निवडणूक प्रचार आणि इतर खर्चासाठी वापरण्यात येणार असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले. "आम्हाला कोणतेही इलेक्टोरल बाँड मिळत नाहीत. सर्व काही भाजपच्या हातात आहे. 6 नोव्हेंबरला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) नवे अध्यक्ष खरगे यांच्या सन्मानार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे," असेही शिवकुमार म्हणाले.