खजिन्याचा शोधात गेले अन्... कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य
Karnataka Crime News : कर्नाटकात खजिन्याच्या नादात तिघांची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तिघांची हत्या करुन त्याचे मृतदेह कारसोबत जाळून टाकले. पोलिसांनी मृतांसह आरोपींची ओळख पटवून तपास सुरु केला आहे.
Karnataka Crime : कर्नाटकातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकात एका कारमध्ये तिघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. कारमध्ये जळालेले तिघेही मंगळुरूमधील कर्नाटकच्या बेलथंगडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 'खजिना' शोधून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत तिघांची हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. तपास पथकाला तसा संशय असून तुमकुरु पोलिसांना याप्रकरणात काही महत्त्वाचे पुराव मिळाले आहेत.
कर्नाटकातील तुमाकुरू येथे कारमध्ये तीन जळालेले मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिघेही मंगळुरूच्या बेलथनगडी तालुक्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवून लुटले गेले. यानंतर तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह एका तलावाजवळ कारमध्ये टाकून कार पेटवून देण्यात आली. तपास पथकाला या घटनेबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. लवकरच संपूर्ण टोळी पकडली जाईल, अशी माहिती तुमकुरु पोलिसांनी दिली.
कुंचागी गावाच्या एका तलावाजवळ एक जळालेली कार सापडली होती. गाडीचा तपास केला असता त्यात तीन जळालेले मृतदेह आढळून आले. दुसऱ्या ठिकाणी तिघांचीही हत्या करण्यात आल्यानंतर मृतदेह तलावाशेजारील गाडीत टाकण्यात आले. त्यानंतर कार पेटवून देण्यात आली, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाची बरीच माहिती हाती लागली असून लवकरच याचा खुलासा केलासा जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लपवून ठेवण्यात आलेला खजिना मिळवण्यासंदर्भात आहे. आरोपींनी तिघांनाही खजिन्याचे आमिष दाखवून बोलवलं होतं. आरोपींचे म्हणणं होतं की त्यांना काही गाडलेला खजिना सापडला होता ज्यात सोन्या-चांदीचे दागिने होते आणि त्यांना ते स्वस्त दरात विकायचे होते. त्यामुळे हत्या झालेले तिघेही पैसे घेऊन आरोपींना भेटायला आले होते. आरोपींन तिघांकडील पैसे लुटून त्यांचा खून केला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यांमध्ये सहा आरोपींचा सहभाग आहे. यातील तिघांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचा तपास सुरु आहे. तपासामधून तिघांची हत्या दुसऱ्या ठिकाणी झाली होती. हत्येनंतर तिघांचेही मृतदेह जाळून टाकण्यात आले आणि त्यांना तलावाशेजारी सोडून देण्यात आलं. तिघांचे मृतदेह जाळल्यानंतर त्यांची ओळख पटवता येणार नाही असे आरोपींना वाटत होतं