टीपू सुलतानच्या तोंडाला फासलं काळं, चित्रपटाच्या पोस्टरवरुन नवा वाद
Tipu Sultan Film:कर्नाटक विधानसभेच्या मतदानाची तारख जसजशी जवळ येतेय, तसतसं राजकीय वातावरण आणखी तापू लागलं आहे. आता टीपू सुलतान चित्रपटावरुन नाव वाद उभा राहिला आहे.
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election) मतदानाआधी सुरु झालेले वाद काही थांबायचं नाव घेत नाहीए. आता 'टीपू' चित्रपटावरुन (Tipu) नवा वाद निर्माण झाला आहे. टीपू सुलतानच्या चेहऱ्याला काळं फासलेलं चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटात मैसूरच्या राजाची संपूर्ण कहाणी उलगडून दाखवण्यात आल्याचा दावा दिग्दर्शकाने केला आहे. संदीप सिंह (Sandeep Singh) आणि रश्मि शर्मा (Rashmi Sharma) हे या चित्रपटाचे फिल्ममेकर आहेत. या चित्रपटच्या माध्यमातून टीपू सुलतानचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं संदीप सिंह यांनी म्हटलंय.
टीपू चित्रपट बनवण्याचा उद्देश?
टीपू चित्रपटाच्या पोस्टरबरोबरच पहिला टीझरही प्रदर्शित (Tipu Film Poster Release) करण्यात आला आहे. 8 हजार मंदिरं आणि 27 चर्च तोडण्यात आले. 40 लाख हिंदूंच मुस्लिम धर्मांतर करण्यात आलं. त्यांना बीफ खाण्याची जबदरस्ती करण्यात आली. एक लाखाहून अधिक हिंदुंना तुरुंगात कैद करण्यात आलं. तर कालीकतमधल्या 2 हजाराहून अधिक ब्राम्हणांना संपवण्यात आलं, अशी माहिती टीझरच्या सुरुवातीला देण्यात आली आहे. टीपू सुलतानने 1783 सालीच जिहादची घोषणा केली होती असा दावा टीझरमध्ये करण्यात आला आहे. हे दावे केल्यानतंर टीझरमध्ये टीपू सुलतानचा चेहरा समोर येतो आणि चेहऱ्यावर काळं फासलं जातं. शेवटी ही एका कट्टर सुलतानची कहाणी असल्याचं लिहिण्यात आलं आहे.
हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. यात हिंदी, कन्नड, तामिळ तेलुगू आणि मल्यालम भाषांचा समावेश आहे. टीपू सुलतानची खरी कहाणी कळल्यावर आपण हैराण झालो, टीपू सुलतानची सत्य कहाणी समोर आणण्यासाठी हा चित्रपट बनवत असल्याचं संदीप सिंह यांनी म्हटलंय.
कर्नाटक निवडणूकीत जय बजरंगबली
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत सध्या जय बजरंगबलीचे नारे गुंजतायत. राज्यात भाजपकडून हनुमान चालिसाचं पठण केलं जाणार आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या शहरातही हनुमान चालीसा पठण करण्याची तयीरी केली जात आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी आणली जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. यावर कर्नाटकचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
बजरंग दल रस्त्यावर उतरला
काँग्रेसच्या विरोधात बजरंग दल आक्रमक झाला असून हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बजरंग दलातील कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून हनुमान चालिसाचं पठन केलं. बजरंग दलला पाठिंब देत भाजपही आक्रमक झालं आहे.