Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज घोषणा निवडणुकीची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होत आहे. कर्नाटकात एकूण 224 मतदारसंघ आहेत.
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची आज घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होत आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीची मतमोजणील जाहीर करण्यात येणार आहे. कर्नाटकात एकूण 224 मतदारसंघ आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर
कर्नाटकात 5.22 कोटी मतदार आहेत. तर 18 ते 19 वयोगटातील युवा मतदार - 9.17 लाख आहेत. कर्नाटक निवडणुकीची 24 मे पूर्वी प्रक्रिया संपवली जाईल आहे. 20 एप्रिलला अर्ज भरण्याची अखेरची तारीख असणार आहे. तर 10 मे रोजी मतदान आणि 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर एक लोकसभा आणि तीन विधानसभेची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. ओडिसामध्ये विधानसभा, उत्तर प्रदेश विधानसभा, मेघालय विधानसभा, जालंधर लोकसभेची निवडणूक जाहीर केली आहे.
1,320 मतदान केंद्रांवर फक्त महिला कर्मचारी
80 वर्षांवरील लोकांसाठी मतदानाची सुविधा ही घरातून करण्यात आली आहे. या लोकांना आता घरातून मतदान करता येणार आहे. तसेच आदिवासींसाठी विशेष मतदान केंद्रे असणार आहेत. तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. सुमारे 1,320 मतदान केंद्रांवर फक्त महिला कर्मचारी असतील. यासोबतच आम्ही महिला सक्षमीकरणालाही चालना देत आहोत. आम्ही 240 मतदान केंद्रांना मॉडेल मतदान केंद्र बनवू आणि तरुणांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी 224 मतदान केंद्रांवर फक्त तरुणांची व्यवस्था असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
कर्नाटकात 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 80 तर जनतादल सेक्युलरला 37 जागा मिळाल्या होत्या. मात्र बहुमत थोडक्यात हुकल्याने तेव्हा भाजपला सरकार स्थापन करता आले नव्हतं. जनता दल सेक्युलरने काँग्रेससह सरकार स्थापन केलं होते. पण पक्षातल्या बंडखोरीमुळे ते सरकार पडले होतं. त्यानंतर भाजपच्या येडीयुरप्पांचे सरकार आलं. सध्या कर्नाटकची धूरा बसवराज बोम्मईंच्या खांद्यावर आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्व शक्तीपणाला लावणार असेच दिसून येत आहे. मुस्लिमांना अल्पसंख्याक म्हणून मिळणारं 4 टक्के आरक्षणही रद्द करण्यात आले आहे. ते आरक्षण वोक्कालिंगा आणि लिंगायत समाजाला वाटून देण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकचं समीकरण बदलले आहे. दोन्ही समाज राजकीय दृष्ट्या सजग असल्यामुळे त्याचा निवडणूकीत भाजपला फायदा होणार असल्याचा कयास लावला जात आहे.