मंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुक मतमोजणीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत आहे. आता पर्यंत कोणत्याही जागेवरचा स्पष्ट निकाल लागला नाही. मात्र, प्राथमिक कल हाती येत आहेत. जे क्षणाक्षणाला बदलताना पहायला मिळत आहे. कधी काँग्रेस तर, कधी भाजप आघाडी घेत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीत सुरूवातील काँग्रेसने आघडी घेतली होती. मात्र, काही वेळ जाताच भाजपची कामगिरी सुधारलेली दिसत असून, भाजपने आघाडी घेतली आहे. तर, जेडीएसनेही आपला आगडा बदलता ठेवला आहे.


कोणाची कामगिरी कशी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाती आलेल्या कल पाहता भाजपने ७४ तर, काँग्रेसने ६६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, दुसऱ्या बाजूला जेडीएसनेही आपली कमगिरी सुधारली असून, जेडीएस सध्या २४ जागांवर आघाडीवर आहे.


ताज्या अपडेट कुठे पहाल?


दरम्यान,  आजच्या निकालाचे ताजे अपडेट आपणही जाणून घेऊ शकता. निकालाचे ताजे अपडेट आपल्याला  http://zeenews.india.com/marathi/live  पाहता येतील. तसेच, भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट election commission of india ला सुद्धा आपण भेट देऊ शकता.