नवी दिल्ली : २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपची लाट वाढतच आहे. भाजप आणि एनडीए सरकार एकेक राज्य पादाक्रांत करत चालली आहेत. देशातील २० राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यात आता आणखी एका राज्याची भर पडण्याची शक्यता आहे ती म्हणजे कर्नाटक. मे २०१४मध्ये जेव्हा मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती तेव्हा भाजप अखवा एनडीएची केवळ ८ राज्यांत सत्ता होती तर काँग्रेसकडे १४ राज्ये होते. कर्नाटकात भाजपचे सरकार आल्यास काँग्रेसकडे केवळ पुद्दुचेरी, पंजाब आणि मिझोरम ही तीन राज्ये राहतील. दिल्लीसह बाकी ७ राज्यांमध्ये दुसऱ्या पक्षांचे सरकार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर २१ राज्यांत निवडणुका झाल्या यापैकी १४ राज्यात भाजपने सरकार स्थापन केले. 


2014: महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू-कश्मीर
2015: दिल्ली, बिहार
2016: आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी
2017: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा, गुजरात, हिमाचल
2018: त्रिपुरा, नागालँड, मेघालय


१२ राज्यात भाजपने सरकार स्थापन केले - महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर,  आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय.


बिहारमध्ये एनडीएचे साथीदार जदयूचे सरकार आहे. येथे भाजपला पराभव सहन करावा लागला होता. दीड वर्षानंतर त्यांचे जदयूशी गणित जुळले आणि सत्ता स्थापन झाली.


६८ टक्के लोकसंख्या आणि ५९ टक्के इकॉनॉमी असलेल्या राज्यात भाजपचे सरकार


१४ राज्ये जेथे काँग्रेस होती -  हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड, केरल, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल, मेघालय, मणिपूर, मिझोरम, पुद्दुचेरी


८ राज्यात भाजप होते - गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, नागालँड आणि छत्तीसगढ़, पंजाब (अकाली दल-भाजपा), गोवा, सिक्किम 


8 अन्य:जम्मू-कश्मीर (एनसी), तामिळनाडू (एआईएएमडीके), बंगाल (टीएमसी), ओडिशा (बीजेडी), उत्तर प्रदेश (सपा), बिहार (जेडीयू), दिल्ली (आप), त्रिपुरा (सीपीएम)
नोट: टीआरएस शासित तेलंगाना जून 2014मध्ये झाले


64 लोकसभेच्या जागा असलेल्या ४ राज्यांत या वर्षी होणार निवडणुका
1) मिझोरम: 1 लोकसभा जागा
2) राजस्थान: 25 लोकसभा जागा
3) छत्तीसगड: 11 लोकसभा जागा
4) मध्य प्रदेश:27 लोकसभा जागा