प्रताप नाईक, झी मीडिया, बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक धर्म आणि जात या मुद्यांभोवती येऊन पोहोचली आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसचे दिग्गज नेते मठ, मंदिरांना मोठ्या प्रमाणात भेटी देत असल्याचे चित्र कर्नाटकमध्ये पहायला मिळतंय... कर्नाटक सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला अल्पसंख्याक धर्माची मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय समिकरणं बदलली आहेत. देशातील लिंगायत धर्मियांना स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र; कर्नाटक राज्यात मोठी जनआंदोलनं झाली. कर्नाटकमध्ये तर लाखोंच्या संख्येने लिंगायत समाज स्वतंत्र धर्मासाठी रस्त्यावर उतरला. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लिंगायत समाजाला अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला... या निर्णयानंतर कर्नाटकातील राजकारण पुर्णता ढवळून निघालंय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमध्ये विरशैव लिंगायत आणि लिंगायत असे दोन गट पडले... त्यामुळे परंपरागत भाजपाचा मतदार आसणारा लिंगायत समाज विभागला जाईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. हिंदू धर्मात फूट पाडण्याचं षडयंत्र सिद्धरामय्या सरकारने रचलं असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. 


कर्नाटकमध्ये मोठ्या संख्येनं असणारा विरशैव लिंगायत समाज भाजपाच्या बाजूने भक्कमणे उभा रहावा, यासाठी भाजपाचे  अध्यक्ष अमित शाह कर्नाटकमधील लिंगायत मठांना न चुकता भेटी देत आहेत... काही मठाधीश आणि पंचाचार्य यांनीदेखील सिद्धरामय्या यांच्या निर्णयाला उघड विरोध केलाय.


कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येपैंकी ६.५ कोटी लोकसंख्या ही लिंगायत समाजाची आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकारणावर लिंगायत समाजातील नेत्यांची मोठी पकड आहे. यातील बहुसंख्य लिंगायत समाजाचे नेते हे भाजपामधे आहेत... त्यामुळे सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाची काही मत आपल्या बाजुने करता येईल, यासाठी लिंगायतामधे फूट पाडल्याची तक्रार भाजपा नेते आणि पंचाचार्य करत आहेत... दुसरीकडे बसवेश्वर यांचं जन्मस्थान असणाऱ्या बसवन्ना बागेवाडी गावातील नागरिकही सरकारचा निर्णय योग्य असल्याचं सांगतात. सिद्धरामय्या सरकारच्या निर्णयांना मतदार राजा निवडणुकीत कसा प्रतिसाद देतोय. हे बघणं उत्सुकतेचं आहे.