बदामी, बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील राजकीय रंगत वाढत चालली आहे.  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बदामी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपनेही बेळ्ळारीचे खासदार श्रीरामलु यांना सिद्धरामय्या यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवलंय. पाहूया या राजकीय रणनितीचा रिपोर्ट...कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे भाजप आणि जनता दल सेक्लुलरच्या नेत्यांवर तुटून पडत आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या यांना घेरण्याची रणनीती भाजप सोबतच जनता दल सेक्युलरने आखलेली आहे. त्यामुळेच म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसांघात सिद्धरामय्या यांच्या विरोधात जनता दल सेक्युलरन जी.टी.देवेगौडा यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर भाजपनेही जनता दल सेक्युलरच्या उमेदवाराला मदत करून सिद्धरामय्या यांचा पाडाव करण्याची रणनीती आखली आहे.. त्यामुळे सिद्धरामय्या यांनी प्लॅन बी तयार करून चामुंडेश्वरी मतदारसंघावर पडलेला वेढ्यातुन काही अंशी सुटका करुन घेण्यासाठी उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघाची निवड केली. 


भाजपने तात्काळ बेळ्ळारीचे खासदार श्रीरामलु यांना बदामीच्या मैदानात उतरवलं.  मुख्यमंत्री कुठूनही निवडणूक लढवु देत, त्यांचा पराभव करणार असं भाजप नेते म्हणतायेत. श्रीरामलु यांच्या उमेदवारी बाबत भाजपान देखील गुप्तता पाळली होती.. बदामी विधानसभा मतदारसंघात सिद्धरमय्या आणि श्रीरामलु हे निवडणूक रिंगणात उतरण्यापाठीमागे जातीय समीकरण देखील आहे.



मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे धनगर समाजाचे आहेत. त्यामुळे कुरुबा, एससी, लिंगायत आणि इतर समाजाच्या मतांवर डोळा आहे. तर भाजपा उमेदवार श्रीरामलु हे वाल्मिकी समाजाचे आहेत.. त्यामुळे वाल्मिकी समाज आणि भाजपाचा परंपरागत मतदार विरशैव लिंगायत समाजाच्या मतांवर भाजपची मदार आहे. जातीय समीकरणं आणि श्रीरामलु यांच्या पाठिमागे असलेलं भक्कम आर्थिक पाठबळ यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे चालुक्यांची राजधानी बदामी मतदारसंघात पुन्हा एकदा तुल्यबळ लढत होणार हे नक्की.