नवी दिल्ली : नुकतीच झालेली कर्नाटक विधानसभा निवडणूक राजकीय पक्ष आणि त्यांनी केलेल्या खर्चाच्या बाबतीत देशातील आतापर्यंतची सर्वात महागडी ठरलीये. हे सर्वेक्षण सेंटर फॉर मीडिया स्टडीजने केलंय. या सर्वेक्षणात कर्नाटक निवडणूक ही सर्वात खर्चिक निवडणूक ठरलीये. सीएमएसच्या सर्वेक्षणानुसार विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी कर्नाटक निवडणुकीसाठी तब्बल ९५००-१०,५०० कोटी रुपये खर्च केले. हा खर्च राज्यात आयोजित करण्यात आलेल्या गेल्या विधानसभेच्या तुलनेत दुप्पट आहे. दरम्यान, यात पंतप्रधानांच्या अभियानात झालेला खर्च सामाविष्ट नाहीये. गेल्या २० वर्षात सीएमएसद्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेला खर्च साधारणपणे देशातील दुसऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या खर्चापेक्षा अधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात १२मेला मतदान झाले होते, तर आज मतमोजणी सुरु आहे. सर्वेक्षणानुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जो एकूण खर्ट झाला त्यातील वैयक्तिक उमेदवारांचा खर्च ७५ टक्क्यांपर्यंत वाढला. 


काँग्रेसचे कर्नाटकाचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांचा चामुंडेश्वरी विधानसभा मतदार संघात पराभव झाला आहे. सिद्धरामैय्या चामुंडेश्वरी आणि बदामी या २ मतदार संघातून निवडणूक लढवत होते, त्यापैकी चांमुंडेश्वरीत सिद्धरामैय्या यांचा पराभव झाला आहे. तर बादामीत देखील सिद्धरामैय्या पराभवाच्या छायेत आहेत. बादामी मतदार संघात सिद्धरामैय्या यांच्या जिंकण्याच्या अपेक्षाही दुसरीकडे व्यक्त केल्या जात आहेत.  ( लाईव्ह अपडेटसाठी क्लिक करा http://zeenews.india.com/marathi/live ) जर कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले असते, तर सिद्धरामैय्या हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र त्यांचाच एक नाही तर दोन विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्याने, कर्नाटकातील काँग्रेसच्या पराभवापेक्षा ही बाब मोठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे, त्यामुळे भाजपाला कर्नाटकात स्वबळावर सरकार स्थापन करता येणार आहे. (