मुंबई : कर्नाटकातून हिजाबच्या वादाची सुरवात झाली, ज्याचे पडसाद आपल्याला हळूहळू महाराष्ट्रभर पाहायला मिळाले. हा वाद सुरु होऊन आता अनेक दिवस उलटले, तरी देखील कर्नाटकातील हिजाबचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्याच आता एक आश्चर्यकार बातमी समोर आली आहे. आता एका इंग्रजी लेक्चरने आपल्या हिजाब शिवाय शिकवणे चांगले वाटत नाही असं म्हणत आपली नोकरी सोडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जैन पीयू कॉलेजमधील महिला लेक्चरचा हिजाब काढून शिकवल्याने स्वाभिमान दुखावला आज आहे. त्यामुळेच तिने स्वत:च्या इच्छेने राजीनामा दिला आहे.


हिजाबचा वाद सध्या उच्च न्यायालयात सुरु आहे.  शाळांमध्ये हिजाबसह कोणत्याही प्रकारचे धार्मिक पोशाख किंवा कपडे परिधान करण्यास परवानगी नाही. या वादाच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.


हिजाबचा वाद उडुपीपासून सुरू झाला होता. तेव्हापासून देशाच्या विविध भागांत हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोधात निदर्शने होत आहेत. पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे हा मुद्दा अधिकच तापला आहे.


ज्या महात्मा गांधी मेमोरिअल कॉलेजमधून संपूर्ण वाद सुरू झाला, ते गेल्या १० दिवसांपासून बंद होते. आता ते परीक्षेसाठी खुले करण्यात आले आहे. 
सध्या तेथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उडुपी अतिरिक्त एसपी एस.टी. परिस्थिती सामान्य असून खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे सिद्धलिंगप्पा यांनी सांगितले.


सीएम बोम्मई काय म्हणाले


त्याचवेळी, हिजाबच्या वादातून कर्नाटक विधानसभेतही गदारोळ सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपले सरकार हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन करेल, असे स्पष्ट केले आहे.


गुरूवारी काँग्रेस आमदारांनी कर्नाटक विधानसभेत रात्रभर निदर्शने केली. तसेच भगव्या झेंड्याच्या वक्तव्यावरून त्यांनी राज्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.