बंगळुरू :  येडियुरप्पा यांनी अखेर आपला राजीनामा राज्यपालांना सोपवला आहे. बहुमत चाचणीच्या आधीच येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी येडियुरप्पा यांनी भावनिक भाषण केलं. यावेळी येड़ियुरप्पा यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले होते. आपल्याकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने आपण राजीनाम देत आहोत असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे, यानंतर येडियुरप्पा यांनी २ दिवसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे २ दिवसाचं भाजप सरकार कोसळलं आहे. आता कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण बहुमत सिद्ध करण्यात येडियुरप्पा अयशस्वी झाले आहेत. या राजकीय नाट्यामुळे कर्नाटकात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष सत्तेत येण्याचे संकेत आहेत.कर्नाटकात भाजपचं सरकार अखेर गडगडलंय असं म्हणता येईल. भाजपचं ऑपरेशन कमळ यशस्वी होऊ शकलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या जनतेचे आपल्या भाषणात आभार मानले आहेत, आम्ही नंबर वनचा पक्ष म्हणून पुढे आलो. सिद्धरामैय्या यांच्या अपयशामुळे आम्हाला यश मिळालं, असं येडियुरप्पा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. येडियुरप्पा आपल्या भाषणात अतिशय भावूक आहेत. आम्ही कमी आकड्यावरून कसे वाढत गेलो, असंही येडियुरप्पा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. येडियुरप्पा भाषण करताना संतापलेले तर होतेच, पण भावूकही दिसत होते. ३१ मे १९९६ रोजी अटलबिहारी वाजपेयींचा राजीनामा... तसाच आज (१९ मे २०१८) राजीनामा येडियुरप्पा देणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


बहुमत चाचणी अगोदर येडियुरप्पांचं विधानसभेत भाषण - मुद्दे लाईव्ह


बहुमत चाचणी अगोदर येडियुरप्पांचं विधानसभेत भाषण


परिवर्तन यात्रेत मला नागरिकांचा खूप प्रतिसाद मिळाला.


सहा करोड लोकांचे मला आभार मानायचेत - येडियुरप्पा


निवडणुकीतून आम्हाला जनतेचा कौल मिळाला - येडियुरप्पा


निवडणुकीकरता आम्ही राज्यपालांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं - येडियुरप्पा


निवडणुकीपूर्वी काँग्रेस - जेडीएसनं एकमेकांवर चिखलफेक केली... आणि निवडणुकीनंतर मात्र हातमिळवणी करत षडयंत्र केलं - येडियुरप्पा


राज्यातील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की त्यांनी जेडीएस - काँग्रेसचा तिरस्कारच केलंय - येडियुरप्पाबंगळुरू :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा विधानसभेत लाईव्ह


परिवर्तन यात्रेत मला नागरिकांचा खूप प्रतिसाद मिळाला... सहा करोड लोकांचे मला आभार मानायचेत - येडियुरप्पा


निवडणुकीतून आम्हाला जनतेचा कौल मिळाला - येडियुरप्पा


निवडणुकीकरता आम्ही राज्यपालांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं - येडियुरप्पा


निवडणुकीपूर्वी काँग्रेस - जेडीएसनं एकमेकांवर चिखलफेक केली... आणि निवडणुकीनंतर मात्र हातमिळवणी करत षडयंत्र केलं - येडियुरप्पा


राज्यातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की त्यांनी जेडीएस - काँग्रेसचा तिरस्कारच केलाय - येडियुरप्पा


जनादेश असतानाही सत्ता नसल्याचं दु:ख... भाषण करताना येडियुरप्पा भावूक

असा विचार केला होता की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू - येडियुरप्पा


कर्नाटकाला 'मॉडल राज्य' बनवायचं होतं - येडियुरप्पा


कर्नाटकात आम्ही ४० वरून १०४ जागांवर पोहचलो - येडियुरप्पा


लोकशाही व्यवस्थेवर भाजपचा विश्वास - येडियुरप्पा


आज माझी अग्निपरिक्षा - येडियुरप्पा होतेय... आपल्याला प्रामाणिक नेत्यांची गरज - येडियुरप्पा


मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतोय... - येडियुरप्पा


विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १११  मतं मिळवण्यात भाजपला अपयश


बहुमत चाचणी अगोदरच येडियुरप्पांची माघार