बंगळुरु : कर्नाटक सरकार सध्या मोठ्या संकटातून जात आहे. रविवारी अमेरिकेहून बंगळुरुला पोहोचलेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी एचडी कुमारस्वामी यांनी आपल्या पार्टीच्या आमदारांसोबत मिटींग घेतली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेता जी परमेश्वर यांच्यासोबत देखील त्यांनी चर्चा केली. पण यातून काहीच स्पष्ट झाले नाही. इथे मुंबईत आलेले 10 आमदार राजीनाम्यावर अडून असून त्यांनी बंगळुरुला परतण्यास नकार दिला आहे. आता सोमवारी जी परमेश्वर यांनी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांना ब्रेकफास्टवर आमंत्रित केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आपल्या मंत्र्यांकडून राजीनामा घेऊन रुसून मुंबईत आलेल्या आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देऊ शकते. यामागे मोठा असंतोष आहे. काही आमदार खूप मोठ्या काळापासून मंत्री बनण्याची स्वप्ने बघत आहेत. पण त्यांचे कोणी ऐकत नसल्याने त्यांनी बंड पुकारले आहे. 



मंगळवारी निर्णय


कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे.  सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.