कर्नाटकात घोडेबाजाराची शक्यता; आमदार सांभाळण्याचे काँग्रेस, जेडीएससमोर आव्हान
आतापर्यंत २८ आमदार कुमारस्वामींच्या उर्वरित आमदार ९ वाजेपर्यंत पोहचतील असा अंदाज आहे. कुमारस्वामींच्या घरीच जेडीएसच्या आमदारांची बैठक होणार आहे.
बंगळुरू: कर्नाटकात जेडीएसनं सत्ता स्थापनेचा दावा केल्यावर आता आमदारांना एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान कुमारस्वामींसमोर आहे. जेडीएसचे दोन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं पुढे आल्यावर कुमारस्वामींनी सर्व आमदारांना घरी बोलावून घेतलं आहे. भाजपच्या संपर्कातल्या आमदारांनाही योग्य तो सन्मान राखला जाईल असं आश्वासन कुमारस्वामींनी दिलंय. आतापर्यंत २८ आमदार कुमारस्वामींच्या उर्वरित आमदार ९ वाजेपर्यंत पोहचतील असा अंदाज आहे. कुमारस्वामींच्या घरीच जेडीएसच्या आमदारांची बैठक होणार आहे.
कर्नाटकमध्ये काही तासांतील महत्त्वाच्या घडामोडी