PHOTO: SRK ची बेस्ट फ्रेंड, सलमानसोबत केलं नाही काम; आमिरसोबत 5 वर्षे वैर, एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

Juhi Chawla Birthday Special : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री ऐश्वर्या किंवा आलिया नाही तर ही 90 व्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी आज एकाही चित्रपटात काम करत नाही तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री ती आहे. 

| Nov 13, 2024, 12:10 PM IST
1/9

90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री जुही चावला आज चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी चाहते अजूनही तिची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. 13 नोव्हेंबर 1967 रोजी जन्मलेली जुही 57 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म हरियाणातील अंबाला इथे झाला. जुही चावलाचे वडील भारतीय महसूल सेवेत अधिकारी होते. तिचं शिक्षण मुंबईतच झाले. 

2/9

अभिनेत्रीने शिक्षणानंतर मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आणि 1984 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. त्याच वर्षी तिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पोशाखाचा पुरस्कारही मिळाला. तर जुही चावलाने 'सुलतनत' चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. हा 1986 मध्ये रिलीज झाला पण तो आपटला.  यानंतर तिने कन्नड फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला, पण इथेही ती काही खास करू शकली नाही आणि पुन्हा बॉलिवूडकडे वळली.

3/9

जुही चावला जेव्हा बॉलिवूडकडे वळली तेव्हा तिला 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून ब्रेक मिळाला. हा हिंदीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. आमिर आणि जुहीच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट होता, जो चीनमध्येही प्रदर्शित झाला होता. इतकंच नाही तर 1988 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट होता.

4/9

जुही चावला आणि आमिर खान खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र होते. त्यांची जोडी हिट ठरली पण एका खोड्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. जवळपास 5 वर्षे ते एकमेकांशी बोलले नाहीत. खरं तर प्रकरण आहे 'तुम मेरे हो' चित्रपटादरम्यान आमिरने जुहीच्या हातात साप टाकला होता आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला होता. हे पाहून अभिनेत्री खूप घाबरली आणि सेटवरून पळू लागली, पण आमिर चेष्टा करत होता पण जुहीला वाटले की आमिर काहीतरी चुकीचे करणार आहे. त्यानंतर ती कधीही आमिरशी बोलली नाही. एवढंच नाही तर 'राज हिंदुस्तानी' तिने आमिरमुळे नाकारला होता.  

5/9

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आणि मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर जुही एकटी पडली पण शाहरुख खानची मैत्रीच तिचा आधार बनली. वयाच्या 18 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी जवळपास 80 चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक हिट चित्रपटही दिले.

6/9

तिच्या संपूर्ण अभिनय कारकिर्दीत जुहीने शाहरुख खान आणि आमिर खानसोबत चित्रपटांमध्ये काम केले, मात्र ती सलमान खानसोबत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. त्याचवेळी माधुरी दीक्षितसोबत स्पर्धा इतकी वाढली होती की, जुही तिच्यासोबत फक्त गुलाब गँग या चित्रपटात दिसली होती.

7/9

1998 मध्ये जुही डुप्लिकेट चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना तिच्या आईचा अपघातात मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या वडिलांचेही दीर्घ आजाराने निधन झाले. 2010 मध्ये त्याचा भाऊ बॉबी पक्षाघाताने कोमात गेला आणि 9 मार्च 2014 रोजी त्याचा मृत्यू झाला.

8/9

शाहरुख आणि जुही केवळ चित्रपटातच नाही तर वास्तविक जीवनातही एकमेकांचे जोडीदार आहेत. दोघेही आयपीएल कोलकाता नाईट रायडर्सचे सह-भागीदार आहेत. या दोघांमधील मैत्री इतकी घट्ट आहे की शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणात जुहीने आर्यनच्या जामीनपत्रावर सही केली होती.

9/9

चित्रपटांपासून दूर असूनही, आज जूही चावला बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. 2024 च्या हुरुन रिच लिस्टनुसार, आज ही अभिनेत्री 4,600 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. जूही चावलाने रेड चिलीज ग्रुपची स्थापना केली आहे. कोलकाता नाइट रायडर्स यातून ती भरपूर पैसे कमावते.