बंगळुरु : काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सरकारबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच एका बंडखोर आमदारांने आपण सरकारबरोबर असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आणखी आमदारांचे बंड शमण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्नाटकातील सरकार कोसळणार अशी स्थिती विरोधकांकडून करण्यात आली होती. दरम्यान, आपण विश्वास दर्शक ठरावाला आपण सामोरे जाणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कर्नाटकात काय होणार, याचीच जास्त चर्चा आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी म्हणालेत, आपण सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. आपण स्वेच्छेने विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याची घोषणा कुमारस्वामी यांनी विधानसभेत केली. त्यांच्या या घोषणेनंतर भाजपनेही आपल्या आमदारांना दोन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रवाना केले आहे. त्यामुळे भाजपचे आमदार सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस मैत्री सरकार फोडणार का, याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे भाजपने सावध भूमिका घेत आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.



आपल्याला एकत्र राहायचे आहे आणि एकत्रच मरायचे आहे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री डी. के. शिवकुमार यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. दरम्यान, एका बंडखोर आमदाराने शिवकुमार यांनी आमचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बंड शमण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.