U-turn घेत होती बस, मागून आला भरधाव दुचाकीस्वार आणि... हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल
अगदी पापण्या लवतात न लवतात, तोपर्यंत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. जो सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवत आहे.
बेंगळुरू : सोशल मीडियावरती आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपले मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ हे आश्चर्यकारक देखील असतात. सध्या सोशल मीडियावरती एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरती काटा उभा राहिल. हा व्हिडीओ बस आणि कारचा, यामध्ये मोठी घटना टळली आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील मंगळुरूमधील एलियार पडवू रोडवर ही घटना घडली.आहे.
येथे रस्त्यावर अचानक यू-टर्न घेत असलेल्या बसच्या धडकेतपासून एक दुचाकीस्वार चमत्कारिकरित्या वाचला आहे. हा रस्ता फारसा वर्दळीचा रस्ता नाही. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मंगळवारी संध्याकाळी एक खाजगी बस मंगळुरूहून एलियार पडवूला जात असताना त्यावेळी रस्त्यावर फारशी वाहने नव्हती. त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर बेसावधपणे बस चालकाने यू-टर्न घेतला. जे दुसऱ्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आले नाही. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
व्हिडीओमध्ये हा दुचाकीस्वारने बसला आपली गाडी धडकू नये म्हणून मिळालेल्या छोट्या गॅपमधून आपली गाडी काढण्याचा प्रयत्न केला. हे करताना दुचाकीस्वाराचा बॅलेंस गेला परंतु त्याने कसंबसं आपला तोल सावरला आणि काही मीटरपर्यंत रस्त्याच्या खाली असलेल्या जागेतून गाडी चावली आणि आपला तोल बिघडू दिला नाही. ही घटना फारच धक्कादाय आहे. अगदी पापण्या लवतात न लवतात, तोपर्यंत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. जो सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडयावर Mangalore City नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच अनेक युजर्सनी त्याला आपल्या अकाउंटवरी शेअर केला आहे.