मुंबई : कर्नाटकच्या काँग्रेस व जेडीएसच्या 17 अपात्र आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला आहे. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांना अपात्र घोषित केलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, हे 17 अपात्र आमदार निवडणूक लढवू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने हे देखील सांगितले की, विधानसभा अध्यक्ष कोणत्याही आमदाराला उपनिवडणूक लढवण्यापासून थांबवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आमदारांना अपात्र घोषित केलं असले तरीही 2023 पर्यंत त्यांना अपात्र ठरवणे चुकीचे आहे. 


याचिकेत कर्नाटक आमदारांना अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होतं यावर दावा करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने 25 ऑक्टोबरला सगळ्या पक्ष्यांना ऐकल्यानंतर हा निर्णय घेतला होता. 


कर्नाटकच्या १७ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्यात आला. आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. मात्र त्या १७ आमदारांना निवडणूक लढता येणार आहे. कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी या १७ आमदारांना अपात्र ठरवलं होतं. 



त्याविरोधात या १७ आमदारांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आदेशांना कोर्टात आव्हान दिलं होतं अखेर सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारत १७ आमदारांना अपात्रच ठरवलं. आता या आमदारांना पुन्हा निवडणूक लढता येणार आहे. अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने आमदारांच्या राजीनामाच्या स्विकार केला होता. आणि त्यांना अपात्र घोषित केलं होतं. तर आमदारां सांगितले की, अध्यक्षांनी याबाबतचे परिक्षण केले नाही की, आमदारांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.