कर्ज न मिळाल्याने संतापलेल्या व्यक्तीने बँकच दिली पेटवून
रागाच्या भरात माणूस काय करेल, हे काही सांगता येत नाही. कर्ज न मिळाल्याने संतापलेल्या व्यक्तीने बँकच दिली पेटवून .
बंगळुरु : Karnataka: Upset a man allegedly set the bank on fire in Haveri district : एक धक्कादायक घटना कर्नाटक राज्यात घडली. वारंवार अर्ज करुनही काहीतरी त्रुटी निघत होती. त्यामुळे नाराज झालेल्या व्यक्तीने बँकच पेटवून दिली. बँक पेटविणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे ही व्यक्ती नाराज झाली होती. रविवारी हावेरी जिल्ह्यातील बँकेला त्याने आग लावली. बँकेला आग लावणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. कागिनेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कर्ज मिळावे म्हणून या व्यक्तीने अनेकवेळा बँकेत अर्ज केला, मात्र वारंवार नकार मिळाल्याने ती व्यक्ती अस्वस्थ झाली. त्याला हा नकार जिव्हारी लागला. त्याने संतापच्या भरात बँकेला आग लावली. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. हे प्रकरण रविवारचे आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या कलमान्वये गुन्हा दाखल
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून कागिनेली पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 436, 477, 435 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला बँकेतून कर्ज घ्यायचे होते, त्यासाठी त्याने बँकेत अर्ज केला होता. मात्र, बँकेने कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याचा कर्ज अर्ज फेटाळला.
बँकेकडून कागदपत्रे आणि काही इतरबाबींची छाननी केली जाते, त्यानंतरच कर्ज स्वीकारले जाते. याप्रकरणी पोलीस आता आरोपीची चौकशी करत आहेत.