Face Disfigured By Makeup: लग्नाआधी मेकअपसाठी गेली आणि घरी येईपर्यंत सुजली! लग्नही मोडलं; जाणून घ्या नेमकं घडलं काय
Woman Face Disfigured during makeup: लग्नाच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं ट्राय करुयात म्हणत या तरुणीने वेगळ्या पद्धतीचा मेकअप केला आणि तिचा हाच निर्णय तिला थेट आयसीयूमध्ये पोहचवण्यासाठी कारणीभूत ठरला.
Woman Face Disfigured By Makeup: मेकअपमुळे चेहरा खराब होणे किंवा मेकअपसाठी वापरलेल्या सामानामुळे चेहऱ्यावर रिअॅक्शन होणे यासारख्या गोष्टी आता काही नवीन राहिलेल्या नाहीत. मात्र कर्नाटमध्ये आपल्या लग्नामध्ये एका मुलीने केलेल्या मेकअपमुळे तिचं लग्न मोडल्याची विचित्र घटना घडली आहे. ब्यूटी पार्लरमधून मेकअप करुन परत येताना या तरुणीचा चेहरा एवढा सुजला की तिला ओळखू येणं कठीण झालं. मेकअपसाठी वापरण्यात आलेल्या सामानामुळे या तरुणीला एवढा त्रास झाला की तिला इंटेसिव्ह केअर यूनिट म्हणजेच (आयसीयूमध्ये) दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे या तरुणीच्या चेहऱ्याची जी अवस्था झाली होती ती पाहून मुलानेच लग्नाला नकार दिला. लग्न कर करतानाच हा मुलगा वऱ्हाडासोबत पुन्हा आपल्या गावी निघून गेला. दुसरीकडे पोलिसांनी पार्लरमधील ब्यूटीशिएनला ताब्यात घेतलं आहे.
प्रयोगामुळे थेट आयसीयूमध्ये भरती
ही संपूर्ण घटना कर्नाटकमधील हासन येथील अरसिकेरे शहरात झाली. 10 दिवसांपूर्वी एक तरुणी येथील एका ब्यूटी पार्लरमध्ये ब्रायडल मेकअप करण्यासाठी गेली होती. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणीने ज्या ब्यूटी पार्लरमधून ब्रायडल मेकअप केला ते एक हर्बल ब्यूटी पार्लर आहे. ब्यूटी पार्लरची संचालिकेने या तरुणीला एका नवीन पद्धतीचा मेकअप नुकताच आमच्याकडे सुरु करण्यात आला असून तुम्ही तो नक्की ट्राय करुन पाहा असा सल्ला दिला. सामान्य मेकअपपेक्षा हा मेकअप अधिक चांगला असेल असं वाटल्याने या तरुणीने या नव्या स्टाइलने मेकअप करण्यासाठी परवानगी दिली. मात्र या नव्या पद्धतीनेमुळे आपल्याला थेट आयसीयूमध्ये जावं लागेल असं या तरुणीला वाटलंही नव्हतं.
...अन् अचानक स्टीम घेतली
हर्बल ब्युटी पार्लरमधील संचालिकेने मेकअप करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाबरोबरच नवीन प्रोडक्टही वापरल्याचा दावा या तरुणीने केला आहे. मात्र या प्रोडक्ट्समुळेच मेकअप केल्यानंतर त्वचेला त्रास होऊ लागला आणि एलर्जीची लक्षणं दिसू लागली. घरी पोहोचता पोहोचता या तरुणीचा चेहरा सुजून लाल झाला. त्यानंतर तिचा चेहरा काळा पडला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणीला लग्नाच्यानिमित्ताने हटके मेकअप ट्राय करायचा होता. तिने फाऊण्डेशनने सुरुवात केली. त्यानंतर तिने लगेच स्टीम मशीनने गरम वाफ चेहऱ्यावर घेतली. त्यामुळेच या तरुणीचा चेहरा काळा पडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात ब्युटी पार्लरवालीला अटक केली आहे.
मेकअपमुळे होणाऱ्या एलर्जीला काय म्हणतात?
आयव्ही एलर्जी हा एलर्जीचा एक प्रकार असून यामध्ये केवळ ब्युटी प्रोडक्ट वापरण्यात आलेल्या त्वचेला त्रास होतो. उदाहरण द्यायचं झालं तर आयशॅडोमधील एखाद्या गोष्टीची एलर्जी असेल तर पापण्या सुजलेल्या आणि थोड्या फुगलेल्या दिसतील. बरं ही लक्षणं केवळ पापण्यांपर्यंत मर्यादीत राहत नाहीत तर इतर शरीरावरही त्याचा परिणाम होतो. अनेक सौंदर्यप्रसादनांमुळे शरीराला एलर्जीचा त्रास होऊ शकतो. ज्यामध्ये त्वचा लाल पडणे, सुजने किंवा खाज येणे यासारखा त्रास होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेच्या दर्जावर किती त्रास होणार हे अवलंबून असतं.