बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळून सुद्धा सत्ता स्थापन करता आलेली नाही. मात्र, ३८ जागा मिळवलेल्या जनता दल सेक्युलर पक्षाने किंगमेकरची भूमिका बजवाली. त्यांनी काँग्रेस च्या (७८ जागा) मदतीने सत्ता स्थापन केली. सत्तेसाठी काँग्रेस-जेडीएस आघाडी झाली. मात्र, आघाडीत एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षे एकत्र सरकार चालविण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या मैत्रीत दरार पडल्याचे दिसत आहे. पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत.


पहिल्या कसोटीत आघाडी अपयशी !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आलेत. २५ मे रोजी एच डी कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना आत्मविश्वासाने सांगितले, हे आघाडी सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल. मात्र, आघाडीत एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. पहिल्या कसोटीत आघाडी अपयशी ठरल्याचे दिसत आहे.


२८ मे रोजी मतदान 


२८ मे रोजी राजराजेश्वरी नगर मतदार संघात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस आमने-सामने येणार आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. मात्र, २२२ जागांसाठी निवडणूक झाली. राजराजेश्वरी नगर आणि जयनगर मतदार संघातील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाले. त्यामुळे येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. तर राजराजेश्वरी नगर मतदार संघात भोगस मतपत्रिका मिळाल्याच्या कारणामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली. आता या जागेवर २८ मे रोजी मतदान होत आहे.


कोण माघार घेणार याची चर्चा ?


जेडीएस-काँग्रेस आघाडी झाल्यानंतर या राजराजेश्वरी नगर मतदार संघातून कोण माघार घेणार याची चर्चा होती. मात्र, निवडणुकीला काही तास उरले असताना दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केलाय. त्यामुळे जेडीएस-काँग्रेस यांचे उमेदवार रिंगणात उतर असल्याने या निवडणुकीत रंगत निर्णाl झालेय.


दरम्यान, जेडीएसने जयनगर मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिलाय. मात्र, आरआर नगरमध्ये पेच कायम आहे. जेडीएसला येथून निवडणूक लढवायची आहे. जीएस रामचंद्र या उमेदवाला काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी जेडीएसची मागणी आहे. मात्र, काँग्रेसने तसे काहीही केलेले नाही. या मतदार संघातून मुनिराथन हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसने जेडीएसचा प्रस्ताव फेटाळलाय.