बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या कॉफी-बिस्किट अर्थातच चहापानावर होणाऱ्या खर्चाचा तपशील उघडकीस आला आहे. हा तपशील पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर, सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. सिद्धरमय्या यांचेकडून केवळ चहापानावर ६० लाख रूपये खर्च झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नात ही माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या 'कावेरी' आणि 'कृष्णा' अशा दोन निवासस्थानी राहतात. या निवासस्थानी त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे निवासस्थानी भेटायला येणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या चहा, कॉफी, बिस्कीट आणि पिण्याच्या पाणावर सुमारे ६० लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. महत्त्वाचे असे की, या खर्चात मुख्यमंत्र्यांना प्रतिदिन भेटायला येणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या चहा, बिस्किटांचा खर्च समाविष्ट करण्यात आला नाही.


माहिती अधिकार कायद्याखाली विचारलेल्या प्रश्नाला आलेल्या उत्तरात म्हटले आहे की, २०१३ ते २०१४ मध्ये चका, कॉफी, आणि पाण्यावर तब्बल १० लाख रूपये खर्च करण्यात आले. स्नॅक्सचा खर्चही यात पकडला असता हा आकडा १३.६५ लाख रूपये इतका होतो. २०१५-१६ मध्ये हाच खर्च ११ लाखांवर पोहोचतो. यात, ४.५६ लाख रूपये बिस्किट आणि पेय पदार्थांवर ६.७ लाख रूपये खर्च करण्यात आले. पाठीमागील वर्षी म्हणजेच २०१६-१७ मध्ये ४.६ लाख रूपये केवळ बिस्किटांवर तर, ६.७ लाख रूपये पेय पदार्थांवर खर्च करण्यात आले. २०१७-१८ सुरू असलेल्या वर्षांत बिस्किटांवर ४.६ लाख तर, ७.२ लाख रूपये पेय पदार्थांवर खर्च करण्यात आले आहेत.