मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांची (Government Employees) आनंदाची बातमी आहे. सरकारने पुढील वेतन आयोगाची घोषणा केली आहे.  कर्मचाऱ्यांच्या वेतनाची (Salary) समिक्षेसाठी एका आयोगाची (7th Pay Commission) समिती तयार केली जाईल. त्यानंतर समितीने दिलेल्या रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समिक्षा केली जाईल. यानंतर लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना (Pensioners) वाढीव वेतनाचा लाभ मिळेल. (karnatka government commission will be set up to review salaries of state government employees)


सरकारची घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक सरकारने (Karnataka Government) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी गूडन्यूज दिली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यापैकी सर्वात मोठी घोषणा ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे.  कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या समितीच्या आयोगाच्या अध्यक्षपदी सचिन सुधाकर राव असणार आहेत. राव हे माजी मुख्य सचिव होते. सातव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टनुसार,  राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समिक्षा केली जाईल. 


कर्मचारी आणि पेन्शनर्सना फायदा


सातवा वेतन आयोगाच्या गठणानंतर कर्मचारी आणि पेन्शनर्सना वाढीव वेतनाचा लाभ मिळू शकतो.  कर्नाटक सरकार ऑक्टोबरमध्ये एक समिती नेमेल. सरकार याबाबत याच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबमध्येच घोषणा करु शकते.  या आयोगाच्या सिफारशींवरच  सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन ठरवणार आहे.  दरम्यान सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या गठणानंतर 6 लाख कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.