करौली : संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावत’ ला करणी सेना आणि इतर राजपूत संघटनांकडून देशभरातून जोरदार विरोध केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सकाळी देशभरातील विविध ठिकाणी तोडफोड करण्यात आली. अशात करणी सेनेच्या प्रवक्त्याने एका वृत्तपत्राला सांगितले की, करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह आणि त्यांच्या साथीदारांनी मुख्यमंत्री योगेंद्र सिंह यांची भेट घेतली. 


योगी आदित्यनाथ यांची भेट


पद्मावतीच्या रिलीजवरून मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, गुजरात आणि उत्तरप्रदेशात वाद होत आहेत. यूपीमध्ये २०० लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मध्यप्रदेशच्या इंदोर आणि भोपालमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. जयपुरमध्ये लोक रस्त्यावर आलेत.


दरम्यान, योगी आदित्यनाथ त्यांच्याशी करणी सेनेच्या प्रमुखांनी २० मिनिटे चर्चा केली. त्यांनी करणी सेनेचं सर्व ऎकून घेतलं. राज्यात लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर कायम ठेवणे त्यांचं काम आहे. पद्मावत बंद करणे आमचं काम. जर भन्साली आम्हाला आधी सिनेमा दाखवणार असतील तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत.


करणी सेनेकडून भन्सालीला ऑफर


करौलीमध्ये करणी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहेत. सर्वच म्हणाले की, भन्सालीचा हा सिनेमा जर २०० कोटींचा असेल तर आम्ही वर्गणी करून त्याला ते पैसे देऊ. राजपूत लोकांच्या मान मर्यादांशी छेडछाड होऊ देणार नाही.