पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज इंडिया गेटजवळ (India Gate) नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. जेट ब्लॅक ग्रॅनाइटमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा विशाल पुतळा तयार करणे सोपे नव्हते. सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती ज्या दगडातून बनवली होती तो दगड तेलंगणातून आणला होता. हा दगड आणण्यासाठी 140 चाके असलेल्या 100 फूट लांब ट्रकचा वापर करण्यात आला आहे. तेलंगणातील खम्मम येथून 1,665 किमी अंतर कापून हा दगड नवी दिल्लीत पोहोचला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पराक्रम दिनी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. सुभाषचंद्र बोस यांच्या ऋणाचे  प्रतिक म्हणून इंडिया गेटवर त्यांचा भव्य ग्रॅनाइटचा पुतळा बसवला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते.



26,000 पेक्षा जास्त तास


सुभाषचंद्र बोस यांचा हा भव्य पुतळा भारतातील सर्वात उंच, वास्तववादी, अखंड, हस्तनिर्मित पुतळ्यांपैकी एक आहे. हा पुतळा 280 मेट्रिक टन वजनाच्या ग्रॅनाइटच्या मोनोलिथिक ब्लॉकवर कोरलेला आहे. 65 मेट्रिक टन वजनाची मूर्ती बनवण्यासाठी प्रचंड ग्रॅनाइट मोनोलिथ कापण्यासाठी 26,000 पेक्षा जास्त तास लागले.


600 फोटोंचे परीक्षण


म्हैसूर येथील पाचव्या पिढीतील शिल्पकार अरुण योगीराज यांच्या नेतृत्वाखालील संघाने पारंपारिक तंत्र आणि आधुनिक साधनांचा वापर करून ही मूर्ती हाताने कोरली आहे.  "ग्रॅनाइटवर चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये आणि भाव कोरण्यासाठी कठोर परिश्रम घेतले गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 600 फोटोंचे परीक्षण करून ते तयार करण्यात आले. माझे स्वप्न साकार करण्याचा हा प्रकल्प आहे असे" अरुण योगीराज यांनी सांगितले. मी लहान होतो तेव्हा मला इंडिया गेटवर जायचे होते आणि आता मला नेताजींचा पुतळा बनवण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या कलाकारासाठी हे स्वप्न सत्यात उतरले आहे, असेही अरुण म्हणाले.



ग्रॅनाइटवर कोरलेला हा पुतळा कदाचित सर्वात मोठी वास्तविक प्रतिमा असल्याचे ते म्हणाले आणि ते काम पूर्ण करण्यासाठी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधील कलाकारांची मदत घ्यावी लागली. मूर्ती आणि तिची तपशिलांना अधिक वेळ देता यावा यासाठी मूर्तिकारांनी 24 तास शिफ्ट पद्धतीने काम कसे सुरू केले हेही अरुण योगीराज यांनी सांगितले. 


अरुण योगीराज म्हणाले की हा प्रकल्प आव्हानात्मक होता पण तो एक सुंदर प्रवास होता ज्यामुळे तो जिवंत झाला. मूर्ती बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ग्रॅनाइटवर कोरीव काम करणे हे आव्हानात्मक काम होते.


ज्या छताखाली हा पुतळा पूर्वी ठेवण्यात आला होता त्यात ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता, जो 1968 मध्ये हटवण्यात आला होता.