Karthik Kansal UPSC: आयएएस ट्रेनी पूजा खेडकर वादामुळे यूपीएससी परीक्षेतील दिव्यांग कोटा चांगलाच चर्चेत आला. या दरम्यान सोशल मीडियावर आयआयटी रुरकी ग्रॅज्युएट कार्तिक कंसल यांची मार्कशीट व्हायरल होतेय. कार्तिक यांनी एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पण दिव्यांग असल्याने त्यांची निवड होऊ शकली नाही. विेशेष म्हणजे, कार्तिक इतर यूपीएससीची दिव्यांग पात्रतेच्या अटीत बसतात. असे असूनही त्यांची निवड नाकारली जातेय. सध्या ते इस्त्रोमध्ये वैज्ञानिक पदावर काम करतायत. ऑल इंडिया सेंट्रल रिक्रूटमेंटच्या माध्यमातून त्यांची निवड झाली आहे. 


बालपणापासूनच व्हीलचेअरवर कार्तिक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 वर्षाचे असल्यापासून कार्तिक व्हिलचेअरवर आहेत. त्यांना मस्कुलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार आहे. कार्तिक यांनी 4 वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. असे असूनही त्यांची सरकारी नोकरीसाठी निवड झाली नाही. 2019 मध्ये त्यांनी यूपीएससीमध्ये 813 वा रॅंक मिळवला. यानंतर 2021 मध्ये 271 वा रॅंक होता. या रॅंकवरुन तर त्यांना सर्वसाधारण कोट्यातूनही आयएएस मिळू शकलं असतं. कारण त्यावर्षी 272 आणि 273 रॅंक वाल्यांना आयएएस पद मिळालं होतं. 2021 मध्ये आयएएससाठी योग्य फंक्शनल क्लासिफिकेशनच्या अटींच्या यादीत मस्कुलर डिस्ट्रॉफीचा समावेश करण्यात आला नव्हता. 



15 पैकी 14 पदे भरली तरीही..


मस्कुलर ड्रिस्ट्रॉफीला भारतीय राजस्व सेवा (इनकम टॅक्स) ग्रुप ए आणि भारतीय राजस्व सेवा (कस्टम आणि एक्साइज) च्या यादीत सहभागी करण्यात आले आहे. 2019 मध्ये कार्तिक कंसल यांना 819 वी रॅंक मिळाली तेव्हा तरी एक सर्व्हिस सहजपणे देता आली असती. पण त्यावेळी लोकोमोटर डिसॅबिलिटीसाठी 15 पदे रिक्त होती. यातील केवळ 14 पदे भरण्यात आली होती. उरलेलं एक पद कार्तिकला मिळू शकलं असतं. पण त्यांना देण्यात आलं नाही. 


मेडिकल बोर्डचं काय म्हणणं?


सीएसई मध्ये पीडब्ल्यूबीडी आरक्षणाव्यतिरिक्त मेडिकल बोर्डचा अभिप्राय तसेच लिहिण्या आणि पाहण्याची क्षमता तपासली जाते. कार्तिकच्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये सुरुवातील 60 टक्के विकलांगता दाखवण्यात आली होती. नंतर एम्सच्या मेडिकल बोर्डनुसार 90 टक्के मस्कूलर डिस्ट्रॉफी सांगण्यात आली. कार्तिक ऐकणे, बोलणे, संवाद साधणे, वाचणे आणि लिहिण्यास सक्षम असल्याचे यात म्हटले होते. अशावेळी या कॅटेगरीतील आयआरएससाठी देखील ते निवडले जाऊ शकले असते. 


एम्सच्या रिपोर्टमध्ये काय?


कार्तिकना मांसपेशींचा त्रास आहे. त्यामुळे ते आपले पाय आणि हाथाचा योग्य पद्धीतने वापर करु शकत नाही. पण व्हिलचेअरवर चालणे किंवा बोटांनी कोणताही हालचाल करण्यात कार्तिकला कोणतीच अडचण नाही, असे एम्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. सर्व शारीरिक मानते पूर्ण केल्यानंतरही, तुमच्या पदानुसार मिळतीजुळती सेवा उपलब्ध नसल्याचे केंद्रीय तक्रार निवारण पोर्टलने म्हटले.