झोजिला, कश्मिर  :  श्रीनगर ते लेह-लडाख मार्गावर बांधण्यात येत असलेला झोजिला बोगद्याचे काम खुप वेगाने होत आहे. बोगदा पुर्ण झाल्यावर  उर्वरित भारताशी लेह-लडाख बारामाही रस्ते मार्गाने जोडला जाईल. हा 'सिल्क रूट' भारतीय लष्करासाठी सुध्दा खुप महत्वाचा आहे. कारण सोनमार्ग ते मीनामार्ग या प्रवासाला आता ४ तासाएवजी फक्त ४० मीनीटं लागणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या धोरणात्मक प्रकल्पामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. त्यातून व्यापार, पर्यटन सुधारेल मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्क्चर लिमीटेड  (MEIL) ही अभियांत्रिकी क्षेत्रातील भारतातील प्रसिद्ध कंपनी झोजिला बोगद्याचं काम वेगाने करत आहे. 


बोगदा जवळ जवळ हिमालयाच्या शिखराएवढ्या उंचीवर बांधला जात आहे. हा भाग बऱ्याचदा  बर्फाच्छादित असतो आणि हे काम अतिशय आव्हानात्मक आहे. नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) ने झोजिला बोगदा प्रकल्पाच्या बांधकामाचे काम MEIL कंपनीकडे सोपवलं होतं. या बोगद्याच्या कामाचं उद्घाटन परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं होतं.



या बोगद्याच्या बांधकामात नवीन ऑस्ट्रियन बोगदा खणण्याची पद्धत, बर्फ काढण्यासाठी स्नो ब्लोअरसारख्या आधुनिक यंत्रांचा वापर केला जात आहे. या भागात किमान तापमान  उणे 40 अंश इतकं कमी असतं. या कठीण अडचणींना तोंड देत, कंपनी ने कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम सुरू ठेवले आहे. निर्धारित वेळेनुसार प्रकल्प पूर्ण करण्यात MEIL परंपरेनूसार या बोगद्याच्या मार्गाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.


या प्रकल्पाचे प्रभारी व्यवस्थापक हरपाल सिंग म्हणाले की, थंडी, आव्हानात्मक वातावरण, बिकट परिस्थिती असतानाही बांधकामं कुठंही थांबलेली नाहीत. वर्षभर उपलब्धतता आणि  प्रवासाचा वेळेची बचत ही या प्रकल्पाची  काही वैशिष्ठे आहेत. आयआयटी दिल्ली आणि आयआयटी श्रीनगर या प्रमुख तांत्रिक शिक्षण संस्था या बोगद्याच्या  कामांवर देखरेख करत आहेत.  कामाच्या दर्जाबद्दल आणि प्रकल्पातील तांत्रिक गोष्टींबद्दल त्या समाधानी आहेत.



17 किमी लांबीचा रस्ता, तीन उभ्या शाफ्ट, चार पूल आणि इतर संबंधित बांधकामे करण्यात येत आहेत. पहिला बोगदा (निलगार बोगदा-1) 468 मीटर लांबीचा आहे तर दुसरा बोगदा (निलगार बोगदा-II) 1,978 मीटर लांबीचा आहे. दोन्ही बोगदे ट्विन ट्यूब टनेल आहेत. तिसरा बोगदा जो सर्वात मोठा आणि मुख्य भाग आहे तो झोजिला बोगदा आहे आणि त्याची लांबी 13 किमी आहे. बोगदा पश्चिमेकडील बालटालपासून सुरू होतो आणि पूर्वेकडील द्रासजवळ मीनामार्ग इथं संपतो.


MEIL या मार्गावर अतिशय वेगाने काम करत आहे. आतापर्यंत सुमारे 40 ते 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर वाहणाऱ्या नदी ओलांडण्यासाठी एकूण चार पूल बांधले जात असून, त्यांची एकूण लांबी 815 मीटर आहे. MEIL या मार्गावर झेड-मोर ते बालटाल असा 17 किमी लांबीचा रस्ता देखील तयार करत आहे. रस्त्याचे सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. नेहमीचे  रस्ते बांधण्यापेक्षा अवघड डोंगराळ आणि बर्फाच्छादित भागात रस्ता तयार करणे हे अधिक कठीण काम असतं.



या प्रकल्पाच्या बांधकामासाठी कंपनी द्वारे एकूण 1,268 आधुनिक आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणे वापरली जात आहेत. या प्रकल्पात सुमारे दोन हजार लोक काम करत आहेत.  हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होत आहे.