Kashmir News: (PoK) पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या बऱ्याच हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या Information नुसार नियंत्रण रषेनजीक (Pakistan) पाकिस्तानच्या खुरापती वाढल्या आहेत. सदर भागात असणाऱ्या Launch Pad वर दहा-बारा नव्हे तब्बल 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचे हे नापाक मनसुबे पाहता अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर भारतीय लष्करानं (Indian Army) सतर्कता बाळगत आवश्यक पावलंही उचलली आहेत. दहशतवादी फक्त घुसखोरीच नव्हे, तर सीमा भागात अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचंही धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एकंदर पाकिस्तानातून दहशतवादाला खतपाणी मिळत असल्यामुळं भारतात तणाव वाढला आहे. 


जवानांपुढे आव्हानं... 
उत्तर काश्मीर (North Kashmir) क्षेत्रात नियंत्रण रेषेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांना फक्त शत्रूवर नजर ठेवण्याचंच काम नसतं. तर, तिथल्या हवामानाच्या माऱ्यालाही त्यांना तोंड द्यावं लागलं. कडाक्याची थंडी,  15-20 फूट बर्फ या परिस्थितीचा फायदाही शत्रूकडून घेतला जाण्याची भीती असते. 


वाचा : Maharashtra political crisis : महाराष्ट्र सत्ता संघर्ष खटला, या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज सुनावणी


यंदाच्या वर्षात घुसखोरीचं प्रमाण घटलं तरीही... 
फेब्रुवारी 2021 मध्ये लागू झालेल्या संघर्षविराम तहानंतर यंदाच्या वर्षी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाण घटलं. पण, पाकिस्तान जुन्या वाटा आणि खुरापतींपासून काही केल्या दूर जाताना दिसत नाही. संरक्षण यंत्रणांशी संलग्न अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्फवृष्टी होण्याआधीच्या काळात घुसखोरीची दाट शक्यता असते. 


जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) 743 किमी LOC पैकी 350 किमी भाग (Kashmir Valley) काश्मीरच्या खोऱ्यात आहे, तर 55 किमी भाग केरन सेक्टरमध्ये आहे. परिणामी लष्कराला इथं जास्त लक्ष द्यावं लागत आहे. सध्याच्या घडीला त्या 250 घुसखोरांची वाट रोखून धरणं किंवा त्यांना कंठस्नान घालणं हे पर्याय नजरेसमोर ठेवत देशहितार्थ पावलं उचलण्याचं काम लष्कर करत आहे.