जम्मू-काश्मीर :  हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हान वानीचा वारसदार सबजार अहमद भट्ट जवानांच्या चकमकीत ठार झाला. त्यामुळे काश्मीर खो-यात अशांतता पसरली आहे, अशा वातावरणात लष्कराकडून ज्युनिअर कमिशन अधिकारी आणि अन्य पदांसाठी परिक्षा घेण्यात आल्या. 


या परिक्षेत काश्मीरी तरूणांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. फुटीरतावाद्यांनी दोन दिवसीय बंद पुकारला असताना मोठ्या संख्येनं या परीक्षेला उपस्थितील लावून या तरुणांनी त्यांना जोरदार चपराक लगावली आहे.