नवी दिल्ली :  आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी विधानसभा निवडणूकीत पार्टीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार करणार नाहीत.


आखली रणनीती


गुजरात येथील आप नेते गोपाल राय यांनी शुक्रवारी सांगितले की, केजरीवाल गुजरात निवडणूकीत प्रचार करणार नाहीत.


गुजरात निवडणुकीत आप कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी घरोघरी जाऊन मत मागण्याची रणनीती आखली आहे. 


 


जनसंपर्कच आधार 


 त्यामूळे राष्ट्रीय नेत्याला स्टार प्रचारक म्हणून रस्त्यावर आणण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. 


पार्टीने आपल्या कार्यकर्त्यांचा असलेला जनसंपर्क हाच प्रचाराचा आधार बनविला आहे. 


निवडक जागांवर 


या निवडणुकीत १८२ जागांवर लढण्यापेक्षा निवडक जागांवर उमेदवार उभे करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.


सामाजिक आणि इतर निवडणूकीची गणित जुळून येतात तिथेच उमेदवार लढणार आहेत. 


३३ जागा लढवणार


यानुसार आम आदमीने ३३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पार्टीकडून तीन सूची जाहीर करण्यात आल्या आहेत. 


नाराजीतून वाचण्यासाठी 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीचे केंद्रीय नेते कुमार विश्वास यांच्यासहित काही असंतुष्ट नेत्यांच्या नाराजीतून वाचण्यासाठी स्टार प्रचारकांना गुजरातमध्ये आणले नाही.


त्याऐवजी जनसंपर्कावर जोर देण्यावर आपने भर दिला आहे.