मुंबई : सोशल मीडिया (Social Media) अकाउंट्स हॅक (Hacking) होण्याचे प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. अकाउंट हॅक झाल्याने संबंधित व्यक्तीला मनस्ताप सहन करावा लागतो. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता प्रवीण तरडे यांचं फेसबूक अकाउंट (Pravin Tarde) हॅक झालं होतं. आता केरळचे राज्यपाल (Keral Governor) आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांचं फेसबूक अकाउंट हॅक झालं आहे.  (keral governor arif mohammed khan facebook page appears to be hacked)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खान यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच याबाबतची तक्रार संबंधित विभागाला दिली असल्याची माहितीही राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.  



आरिफ मोहम्मद खान यांच्याबाबत थोडक्यात


आरिफ मोहम्मद खान हे राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. जे 1980 ते 19846 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. 1986 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर ते बराच काळ बसपचे लोकसभेचे खासदारही होते. आरिफ मोहम्मद खान हे विमान वाहतूक मंत्रीही राहिले आहेत.