Accident News : ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम म्हणजेच जीपीएसने (GPS) आणखी दोन तरुणांचा बळी घेतला आहे. मुसळधार पावसात जीपीएसचा वापर करणं डॉक्टरांना चांगलं महागात पडलं आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने दोन डॉक्टरांनी योग्य मार्ग शोधण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनवर जीपीएसचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. रस्त्याच्या कडेला पाण्याने भरलेल्या भागात आले जिथून त्यांची गाडी पुढे जाऊ शकत नव्हती. मात्र काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं की गाडी नदीत उभी आहे. काही सेकंदातच ते कारसह नदीत बुडू लागले. काही वेळातच त्यांचा आरडाओरडा थांबला आणि दोघेही कारसह नदीत बुडाले. सुदैवाने कारमधील अन्य तीन जण स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. अद्वैत मध्यरात्री त्यांच्या होंडा सिविक कारमधून मित्रांसह पावसात घराकडे निघाले होते. रस्ता कळत नसल्याने त्यांनी जीपीएसचा वापर केला. जीपीएसने त्यांना रस्ता दाखवायला सुरुवात केली मात्र जीपीएस त्यांना मृत्यूचा मार्ग दाखवत आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. जीपीएसने दाखवेलेल्या रस्त्याने ते थेट नदीत पोहोचले. त्यांची कार पाण्याने भरलेल्या नदीत बुडू लागली. सर्वजण आरडा ओरड करत होते. कारमधून तीन जण बाहेर आले मात्र काही वेळातच डॉ.अद्वैत आणि त्यांचा आणखी एक डॉक्टर मित्र कारसह पाण्यात बुडाले. धक्कादायक बाब म्हणजे त्याच दिवशी डॉ. अद्वैत यांचा वाढदिवस होता आणि तो साजरा करून ते परतत होते.


मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथुरुथ भागात ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी 12.30 वाजता डॉ.अद्वैत, डॉ. अजमल आसिफ आणि इतर तीन जण वाढदिवसाची पार्टी करून परतत होते. हे पाचही जण कोचीहून कोडुंगल्लूरला परतत होते. वाचलेल्यांपैकी एक, डॉ. गाजिक थबसीर यांनी जीपीएसमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले. हो आम्ही जीपीएस वापरत होतो. पण मी गाडी चालवत नव्हतो त्यामुळे मी सांगू करू शकत नाही की ही जीपीएसची तांत्रिक चूक होती की मानवी चुकी, असे डॉ. गाजिक थबसीर यांनी सांगितले.


डॉ. गजिक म्हणाले की, त्या दिवशी डॉ. अद्वैतचा वाढदिवस होता आणि डॉक्टर आमच्या हॉस्पिटलमधल्या एका व्यक्तीसोबत सेलिब्रेशन करायला कोचीला गेले होते. डॉ. अजमलची होणारी पत्नीही आमच्यासोबत होती. दरम्यान, तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर डॉक्टर अद्वैथचा मृतदेह कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला आहे. तर डॉक्टर अजमलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला आहे.