`ब्लू व्हेल` गेमने घेतला माझ्या मुलाचा जीव
`ब्लू व्हेल` या ऑनलाईन गेममुळे आत्महत्या करण्याच्या घटना सुरुच असल्याचं दिसत आहे. आता केरळमधील एका तरुणाने `ब्लू व्हेल` गेममुळेच आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
नवी दिल्ली : 'ब्लू व्हेल' या ऑनलाईन गेममुळे आत्महत्या करण्याच्या घटना सुरुच असल्याचं दिसत आहे. आता केरळमधील एका तरुणाने 'ब्लू व्हेल' गेममुळेच आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील एका तरुणाने आपल्या घरात गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळचं वळणं लागल्याचं दिसत आहे.
झालं असं की, ११व्या इयत्तेत शिकणा-या मनोजने गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर आता त्याच्या आईने दावा केला आहे की, 'ब्लू व्हेल' या ऑनलाईन गेममुळेच माझ्या मुलानं आत्महत्या केली आहे.
ब्लू व्हेलमुळे आत्महत्या केल्याचा संशय मनोजच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी मनोजच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मनोजने हा गेम काही महिन्यांपूर्वी डाऊनलोड केला होता.
मनोजच्या आईने पूढे म्हटलं की, मनोजने एकदा स्वत:ला जखमीही केलं होतं. तसेच एकदा नदीतही उडी मारली होती आणि त्याला पोहताही येत नव्हतं. पण त्यावेळी सुदैवाने त्याला बचावण्यात आलं होतं.
ब्लू व्हेल गेममुळे आत्महत्या केल्याचा संशय मनोजच्या आईने व्यक्त केल्यानंतर पोलिसही आता त्या दिशेने तपास करत आहेत.