Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: जगभरात असे अनेक लोक आहेत जे आपल्या प्रतिभेने लोकांना आश्चर्यचकित करतात. त्याचबरोबर काही लोक असेही असतात जे गरज पडेल तेव्हा घरच्याच जुगाडचा वापर करून अशा वस्तू बनवतात, की स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. आपल्या देशातही अशा प्रतिभेची काही कमी नाही. अशाच एका भारतीय मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मुलाचे जगभरातून कौतुक होतंय. असं या मुलाने नक्की काय केलंय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळचा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून मारुती 800 चे रोल्स रॉयसमध्ये रूपांतर केले आहे. त्यानी ही कामगिरी इतक्या कमी किंमतीत केली आहे की हे काम आता अनेकांना आपल्या बजेटमध्ये वाटू लागले आहे.


मारुती 800 चे रूपांतर रोल्स रॉयसमध्ये करण्यासाठी केरळच्या या तरुणाला 45 हजार रुपयांपेक्षाही कमी खर्च आला. एक काळ असा होता तेव्हा भारतात मारुती 800 ची क्रेझ होती. मारुती कार ही केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. वास्तविक, या कारचे बुकिंग आपल्या देशात 9 एप्रिल 1983 रोजी सुरू झाले. लोकांना या कारचे इतके वेड लागले होते की, अवघ्या 2 महिन्यांत 1.35 लाख कार बुक झाल्या होत्या. 



आजही ही कुटुंबाकडे ही कार तुम्हाला पाहायला मिळेल. या कारसोबत अनेकांचे नाते जडले आहे. आता एकविसावे शतक सुरु झाल्याने लोकांमध्ये कारच्या आवडीनिवडी बदललेल्या पाहायला मिळतात. लोकांचा ब्रॅण्डेट कार घेण्याकडे कल पाहायला मिळतो. पण अनेकांच्या बजेटमध्ये या कार नसतात. पण यावरही पर्याय निघाला आहे. आता काही लोक आपल्या कारमध्ये बदल करून तिला वेगळा लूक देत आहेत, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर केरळचा रहिवासी असलेल्या हदीफ नावाच्या मुलाने त्याच्या युट्यूब चॅनल ट्रिक्स ट्यूबवर शेअर केला आहे. यासोबतच मुलाने कारशी संबंधित काही माहितीही शेअर केली आहे. 


हदीफला एक अनोखे वाहन बनवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्याने हा चमत्कार करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. व्हिडीओमध्ये मॉडिफाईड मारुती 800 ची पहिली झलक पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. मात्र ही कार कोणाची आहे हे अद्याप समोर आलेले नाही.