Kerala bus conductor Video : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत (ranjnikant) याचे सिनेमा तुम्ही पाहिले असतीलच. धमाकेदार अॅक्शन, रुबाबदार चाल अन् अंगवळणी असलेल्या सिक्स सेन्समुळे रजनीकांतला फॅन्स डोक्यावर घेतात. त्याचा सिनेमा पाहण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागतात. रजनीकांतचा हा थ्रिल तुम्हीही कधी कधी तुमच्या आयुष्यात देखील अनुभवला असेलच. अशातच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून तुम्हालाही रजनीकांतची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. केरळमधील एका कंडक्टरने (Kerala bus conductor saves passenger) एका प्रवाशाचा जीव वाचवलाय. त्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या ट्रेंडमध्ये आहे. योगायोगाने, रजनीकांत देखील अभिनेता होण्याआधी कंडक्टरच होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक बस रस्त्याने मार्गस्त होत आहे. त्यावेळी बसमध्ये काही प्रवाशी बसलेले दिसतायेत. तर दोन प्रवाशी कंडक्टरजवळ उभे आहेत. दोघंही प्रवासाचं तिकीट काढतायेत. कंडक्टर तिकीट काढत असताना दोन्ही प्रवाशी उभेच असतात. एक वयस्कर प्रवासी खांबाला धरून उभा असतो. तर दुसरा बसच्या दरवाज्यावर तिकीटाची प्रतिक्षा करत असतो. सर्वकाही सुरळीत जात असताना एक उजवा टर्न येतो.


ड्राईव्हर आपल्या नादात बस चालवत असतो. ड्राईव्हरने टर्न घेताना स्पीड कमी केली नाही. त्याने थेट टर्न घेतला. त्यामुळे दरवाजाच्या उभ्या असलेल्या प्रवाशाचा तोल गेला. कंडक्टर एकीकडे तिकीट काढत असताना त्याचं प्रवाशाकडे लक्ष होतं. प्रवाशाचा तोल जातोय लक्षात आल्यावर कंडक्टरने प्रवाशाचा हात धरला अन् त्याला पडण्यापासून रोखलं. सेकंदाच्या काही भागात हा सर्व प्रकार घडला. झालेला प्रकार जोपर्यंत बाकी प्रवाशांच्या लक्षात येतोय तोपर्यंत कंडक्टरने प्रवाशाचा जीव वाचवला होता. 


पाहा Video



दरम्यान, इतर प्रवाशांनी लगेच धाव घेतली अन् प्रवाशाला बसच्या दरवाज्यातून बाहेर काढलं. काही सेकंदात हा सर्व प्रकार घडलाय. कंडक्टरने लगेच घंटा वाजून बस थांबवली. ही घटना गुरूवार दुपारी 2 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास घडली. सध्या या घटनेचा 19 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.