तिरुवअनंतपूरम : केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर आलेल्या पूरामुळे एकच हाहाकाराचं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्ताचं नुकसान या आपत्तीमध्ये झालं असून, आतापर्यंत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. पुरामुळं कोसळणाऱ्या दरडींनी अनेकाचाच जीव घेतला आहे. या परिस्थितीमध्ये बचावकार्याची पथकं अथक परिश्रम करुन नागरिकांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नांत लागली आहेत. (Kerala Flood)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारपासूनच इथं पावसानं जोर पकडण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता शनिवारी केरळमधील नद्या, छोटे जलप्रवाह अधिक वेगानं वाहू लागले. येथील काही गावांचा संपर्कही तुटला. दरडी कोसळलेल्या भागांमधून मृतदेह ढिगाऱ्याखाली गाडले गेले, तर काही ठिकाणी नागरिक पूराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळं दूरवर त्यांचे मृतदेह सापडले. 


केरळवर आलेलं हे संकट मोठं असून, त्या अनुशंगानं आता तिथे प्रशासन मदतकार्यही पोहोचवू लागलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार देवभूमीत आतापर्यंत 100 मदत शिबिरं तयार करण्यात आली असून, तिथं हजारो नागरिकांना आसरा देण्यात येत आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी संपर्क साधत केरळमधील पूरपरिस्थितीता आढावा घेतला. आपण सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली असल्याचं ते ट्विट करत म्हणाले.