कोच्ची : देशात सर्वोत्तम प्रशासन करणाऱ्या राज्यात केरळने बाजी मारलीय.  पब्लिक अफेअर्स सेंटर अर्थात पीएसीच्या  सर्वोत्तम राज्यांच्या यादीत केरळने सलग तीन वर्ष पहिला क्रमांक मिळवलाय. दुसऱ्या स्थानी तामिळनाडू, तिसऱ्या स्थानी तेलंगणा चौथ्या स्थानी हिमाचल प्रदेश, आणि पाचव्या स्थानी कर्नाटक  आहे. 


इंडेक्सच्या क्रमवारीत मध्यप्रदेश शेवटच्या स्थानी आहे. लहान मुलांसाठी चांगले जीवनमान असणाऱ्या राज्यात केरळ पहिल्या तर हिमाचल प्रदेश आणि मिझोराम तिसऱ्या स्थानी आहे.  इंडेक्सच्या या सर्व्हेवेळी वेगवेगळ्या निकषांचा विचार करण्यात येतो. राज्यांचा पायाभूत विकास, मानवी निर्देंशांक, सामाजिक स्वास्थ, महिला आणि बालकल्याण दर, आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन ही राज्य निवडण्यात आली.