Trending News :  'हीरा है सदा के लिए' असं आपण चमकदार अशा हिराबद्दल म्हणतो. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्याकडे एकतरी हिऱ्याचा दागिना असावा. नाही तर एक तरी हिऱ्याची अंगठी असावी. मात्र हिरा घेणं सगळ्यांना शक्य नसतं. मार्केटमध्ये हिऱ्याचे सुंदर सुंदर डिझाइन उपलब्ध आहेत. ते पाहून महिलांना कायम वेड लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैत्रिणी नो, बाजारात हिऱ्याची नवीन डिझाइन आली आहे. विशेष म्हणजे या डिझाइनने गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. एका हिरा कंपनीने अंगठीत सर्वाधिक हिरे लावून 'स्पार्कलिंग' रिकॉर्ड मोडला आहे. 5 मे रोजी हा विक्रम करण्यात आल्याचा गिनीजने आपल्या ब्लॉगवर म्हटलं आहे. 


24,679 हिरे जडलेली अंगठी



मशरूम थीम असलेल्या या अंगठीला 'अमी' असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव संस्कृतमधून आलं असून याचा अर्थ अमरत्व असा होतो. या मनमोहक अंगठीत जवळपास 24,679 हिरे जडलेले आहेत. SWA डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक अब्दुल गफूर अनादियन म्हणतात की, ''अमरत्व आणि दीर्घायुष्य दर्शविणाऱ्या मशरुमला या अंगठीद्वारे श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली आहे.''



यांनी तोडला हा रेकार्ड



केरळमधील SWA डायमंड्स यांनी हा रेकार्ड तोडला आहे. या अप्रतिम अंगठीचा व्हिडीओ GWRने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. SWA डायमंड्सने ही अंगठी आपल्या ब्रँडकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तयार केली आहे. ही अंगठी बनवण्यासाठी जवळपास 3 महिन्यांचा कालावधी लागला.