Twin Village of India: चित्रपट असो किंवा मालिका, जुळ्या मुलांची कहाणी आपण अनेकदा ऐकली, पाहिली असेल. किंबहुना प्रत्यक्षातही काही जुळी मुलं पाहिली असतील. म्हणा यात काही अप्रूप नाही. पण, एक अशी गोष्ट आहे, जी जाणून घेतल्यानंतर मात्र तुम्ही हैराण व्हाल. भलेभले शास्त्रज्ञही ही कहाणी पाहून चक्रावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट आहे, भारतातील एका गावाची. 2000 च्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या या गावात 400 जोड्या जुळी मुलं आहेत. बसला ना धक्का? करताय ना आकडेमोड? 


केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावात असणाऱ्या जुळ्या मुलांना पाहून सर्वजण चक्रावतात. इथं बहुतांश कुटुंबात जुळी मुलं जन्माला येतात. हे कसं, ते मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही. 


स्थानिकांच्या मते या गावावर देवाची विशेष कृपा आहे. ज्यामुळं बहुतांश मुलं जुळी होतात. सूत्रांच्या माहितीनुसार मागील 500 वर्षांमध्ये या गावात जवळपास 300 हून अधिक जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. 



एका अहवालानुसार जगात 1000 मुलांमध्ये 9 मुलं जुळी असतात. पण, या गावात मात्र 1000 मुलांमागे 45 जुळी मुलं जन्माला येतात. काहींच्या मते गावाच्या हवामानामुळे हा परिणाम होत असल्याचं म्हटलं जातं. पण, याचे पुरावे मात्र नाहीत. 



2016 मध्ये भारत, लंडन आणि जर्मनीतील संशोधकांचा एक गट या गावात पोहोचला होता. जिथं त्यांनी गावातील नागरिकांची डीएनए चाचणी केली. पण, या रसह्याची उकल मात्र होऊ शकली नाही.