किळसवाणं! भररस्त्यातील तरुणाची अंघोळ ठरली चर्चेचा विषय... व्हिडीओ व्हायरल
अंघोळ (Bath) तर सगळेच करतात, पण या व्यक्तीने अशी काही अंघोळ केली आहे, जी पाहून तुम्हाला किसळ येईल.
Pothole Unique Protest : पाऊस, खड्डे (Pothole ) आणि मुंबई (Mumbai) हे जणू काही ठरलेलं समिकरण आहे. मुंबईतील खड्ड्यांबद्दल अनेक आंदोलन झाली. अगदी मुंबईची राणी आरजे मलिष्काचं खड्ड्यांवर गाणं प्रसिद्ध झालं. पण मुंबई आणि खड्डे हे समीकरण काही सुटत नाही.
अंघोळ (Bath) तर सगळेच करतात, पण या व्यक्तीने अशी काही अंघोळ केली आहे, जी पाहून तुम्हाला किसळ येईल. खड्ड्यांमुळे त्रस्त एका नागरिकाने एक अनोखं आंदोलन (Unique Protest) केलं. या आंदोलनाच्या व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यांवरील खड्डयांमुळे अनेकांचे जीव धोक्यात आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने अनोखं आंदोलन केलं.
अनोखं आंदोलन व्हायरल
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. बादली, मग साबण आणि टॉवेल घेऊन एक माणूस पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आंघोळ करत आहे. एवढंच नाही, तर हा माणूस त्या घाण पाण्यात कपडे धुताना दिसून येतो.
जबरदस्त परफॉर्मन्स, थेट आमदार भेटीला
या व्यक्तीच्या आंदोलनामुळे थेट आमदार साहेबांना आंदोलनस्थळी पोहोचावं लागलं. साहेबांना बघून हा व्यक्ती तपश्चर्या आणि योगासन करायला लागला.
कुठे करण्यात आलं आंदोलन?
केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील हमजा पोराली या व्यक्तीने आंदोलन केलं आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील नेदुम्बसेरीमधील राष्ट्रीय महामार्गावर 52 वर्षीय व्यक्ती स्कूटरवरून जात असताना खड्ड्यामुळे रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले. या घटनेनंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. (kerala man unique protest toward the growing menace of potholes on the roads trending Viral video in marathi)
केरळ उच्च न्यायालयाने या आंदोलनाची दखल घेतली असून त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहे. जर कुठल्या रस्त्यावर खड्डे आढळल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि इतर कोणत्याही जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे.