मुंबई : शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील कोझिकोड विमानतळावर उतरल्यानंतर दुबईहून येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. विमानाने दोन भाग झाले. ज्यामध्ये वैमानिक आणि सह-वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही वैमानिकांनी कोझिकोड दुर्घटना टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु विमान अपघातातून वाचू शकले नाही. कॅप्टन अखिलेश आणि दीपक साठे हे दोघांनी ही या अपघातात प्राण गमावला. हे दोघेही देशातील उत्कृष्ट वैमानिक होते.


या अपघातात मृत्यू झालेल्यां लोकांमध्ये पायलट-इन-कमांड कॅप्टन दीपक साठे आणि त्याचा सह-पायलट कॅप्टन अखिलेश कुमार हेही आहेत. दीपक साठे हे भारतीय वायुसेना (आयएएफ) चे माजी विंग कमांडर होते आणि त्यांनी हवाई दलाच्या उड्डाण चाचणी आस्थापनामध्ये काम केले होते. 


Its hard to believe that Dipak Sathe, my friend more than my cousin, is no more. He was pilot of Air India Express...

Posted by Nilesh Sathe on Friday, August 7, 2020

कॅप्टन दीपक साठे यांचे अगदी जवळचे मित्र निलेश साठे यांनी सोशल मीडियावर अतिशय भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मित्राची आठवण शेअर केली आहे. यामध्ये दीपक साठे यांनी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी नेमकं काय केलं याची माहिती तर दिलीच आहे. 


पण त्यासोबतच दीपक साठे यांचा एअरफोर्समध्ये असताना नव्वदीच्या काळात विमान अपघात झाला होता. तेव्हा ते सहा महिने रूग्णालयात उपाचर घेत होते. यानंतर ते पुन्हा कधी विमान उडवू शकतील असा कुणीही विचार केला नव्हता. पण प्रचंड इच्छा शक्ती आणि विमान उडविण्याच्या प्रेमापोटी त्यांनी पुन्हा आकाशात भरारी घेतली आणि तो एक चमत्कारच होता. 


दीपक साठे यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुलं जे आयआयटी मुंबईतून पास झाले आहेत. दीपक साठे यांच्या कुटुंबातच शौर्य आहे. त्यांचे वडील कर्नल वसंत साठे जे नागपुरात राहतात. तर त्यांचे भाऊ कॅप्टन विकास साठे हे देखील आर्मीमॅन होते.